आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vaccine Preparation Experts Panel Recommends Second And Third Trial Of Bharat Biotech's Kovaxin From 2 To 18 Years Of Age

लहान मुलांच्या ट्रायल्सला मंजुरी:2 ते 18 वयोगटासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनचे दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्स होणार, एक्सपर्ट पॅनलने दिली मंजुरी

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत 12 ते 15 वयोगटासाठी व्हॅक्सीनला परवानगी

सर्वकाही ठीक राहिल्यास लवकरच कॅनडा आणि अमेरिकेनंतर भारतात 2 ते 18 वयोगटासाठी कोरोनाची स्वेदशी लस तयार होईल. अधिकृत सूत्रांनी सांगितल्यानुसार, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनायजेशन (CDSCO) च्या सब्जेक्ट एक्सपर्ट्स कमेटी (SEC) ने मंगळवारी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायल्सला मंजुरी दिली आहे.

हे ट्रायल AIIMS दिल्ली, AIIMS पटना आणि मेडिट्रिना इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज नागपुरमध्ये 525 सब्जेक्ट्सवर केले जातील. सब्जेक्ट एक्सपर्ट्स कमेटीने मंगळवारी हैदराबादमध्ये भारत बायोटेकच्या प्रस्तावावर विचार केला आहे.

डेटा मॉनिटरिंग बोर्डाला द्यावा लागेल दुसऱ्या फेजचा ट्रायल डेटा

सूत्रांनी सांगितल्यानुसार, एक्सपर्ट्स कमेटीने कंपनीला तिसऱ्या फेजच्या ट्रायलसाठी CDSCO कडून परवानगी घेण्यापूर्वी, डेटा अँड सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड (DSMB) ला दुसऱ्या फेजचा सुरक्षा डेटा देण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी, 24 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत प्रस्तावावर विचार करण्यात आला आणि भारत बायोटेकला रिवाइज्ड क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

अमेरिकेत 12 ते 15 वयोगटासाठी व्हॅक्सीनला परवानगी
यापूर्वीच, सोमवारी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (US-FDA) ने 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी फायजर-बायोएनटेक (Pfizer-BioNTecch) च्या कोरोना लसीला परवानगी दिली आहे. आतापर्यंत ही लस 16 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाला देण्यात येत होती. तिकडे, कॅनडाने मुलांच्या लसीला परवानगी दिली आहे. लहान मुलांच्या व्हॅक्सीनला परवानगी देणारा कॅनडा पहिला देश आहे.

बातम्या आणखी आहेत...