आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीचे दर निश्चित:खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित; कोविशील्ड-780, कोव्हॅक्सिन 1410 रुपये

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यांना लसीचे वाटप लोकसंख्या, रुग्ण आणि लसीकरणातील प्रगतीच्या आधारे केले जाणार

केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित केले अाहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी हे आदेश काढले. त्यानुसार सिरमची कोविशील्ड लस प्रतिडोस जास्तीत जास्त ७८० रुपयांना, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन १,४१० रुपयांना तर रशियाची स्पुटनिक-व्ही लस १,१४५ रुपयांपेक्षा अधिक दराने दिली जाणार नाही.

यासोबतच कंेद्र सरकारने २१ जूनपासून लागू होत असलेल्या राष्ट्रीय कोरोना लसीकरणाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार, केंद्र सरकार लसनिर्मात्या कंपन्यांकडून राज्यांच्या कोट्यातील २५ टक्केसह ७५ टक्के डोस स्वत: खरेदी करेल आणि राज्यांना मोफत देईल. हे वाटप लोकसंख्या, कोरोनाचे रुग्ण आणि लसीकरणातील प्रगती या आधारे केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील १८ वर्षांवरील सर्व लोकांना मोफत लस दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. शिवाय जे लोक खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस घेऊ इच्छित आहेत अशांना सेवा शुल्क म्हणून १५० रुपयांपेक्षा अधिक रक्कम घेता येणार नाही, असेही जाहीर केले होते. राज्यांनी लस वाया जाऊ नये याची पुरती खबरदारी घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयांना कंपन्या थेट लसीचा पुरवठा करू शकतील, अशी सूटही देण्यात आली आहे.

कंेद्र सरकारच्या राज्यांना सूचना
१. जिल्हा आणि लसीकरण केंद्रांना अगोदर लसीचा पुरवठा व्हावा.
२. जिल्हा व केंद्रांवर किती लस उपलब्ध आहे ही माहिती सार्वजनिक डोमेनवर असावी.
३. याबाबत जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहचवावी. जेणेकरून लोकांना अधिक सुविधा मिळू शकेल.
४. आरोग्य व फ्रंटलाइन वर्कर्सना अगोदर लस देण्यास प्राधान्य दिले जाईल.
५. ४५ वर्षांवरील लोकांना दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
६. नंतर १८ वर्षांवरील लोकांना लसीकरणास प्राधान्य दिले जावे.

बातम्या आणखी आहेत...