आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vaccine Testing Will Be Allowed Even If It Is 50% Effective, Instructions Of Drug Controller In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सीन:लस चाचणी 50% प्रभावी ठरली तरी परवानगी मिळेल, भारतात ड्रग्ज कंट्रोलरचे निर्देश

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस 70% हून अधिक प्रभावी ठरावी, हे मूळ आदर्श वापराचे रूप

भारतात विकसित होत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीसाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांनी निर्देश जारी केले आहेत. यानुसार या लसीची मानवी चाचणी ५० टक्के लोकांवर जरी प्रभावी ठरली तरी त्याची परवानगी मिळू शकेल. तिसऱ्या टप्प्यात सहभागी लोकांवर ही चाचणी ५० टक्के यशस्वी ठरायला हवी. मात्र, जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकी फूड व ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनचे निकष वेगळे आहेत. यानुसार, भारतात जेवढ्या लोकांना ही लस दिली गेली आहे त्यातील किमान निम्मे लोक संसर्गापासून सुरक्षित असल्याचे सिद्ध करावे लागेल. किमान एक वर्ष तरी ही लस दिलेले लोक सुरक्षित राहायला हवेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, की लस आदर्श स्वरूपात किमान ७० टक्के लोकांपेक्षा अधिक जणांवर प्रभावी ठरली आहे. मात्र, ५० टक्के लोकांवर यश मिळाले तरी ते प्रभावी मानले जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...