आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vaccine Tracker Portal Monitor On Infected People Despite Vaccination; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:लस घेऊनही संसर्ग झालेल्यांवर व्हॅक्सिन ट्रॅकर पोर्टलची नजर; कोरोना विषाणूचे नवे-नवे व्हेरिएंट्स आणि त्यांच्या परिणामांचा अभ्यास करेल प्लॅटफॉर्म

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: पवन कुमार
  • कॉपी लिंक
  • नव्या पोर्टलवर डेटाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अनेक फिल्टर लावले जाणार

कोरोनाचा संसर्ग अद्याप संपलेला नाही आणि पुढे विषाणूत कसा बदल होणार यावर वैज्ञानिकांची वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे देशात लस घेतल्यानंतर ज्यांना संसर्ग (ब्रेक थ्रू इन्फेक्शन) होत आहे, त्यांच्या आरोग्यावर पूर्ण लक्ष ठेवण्याचा निर्णय आता केंद्र सरकारने घेतला आहे. वस्तुस्थिती समजावी आणि त्यानुसार पुढील धोरण ठरवता यावे हा त्यामागचा हेतू आहे. केंद्र सरकार व्हॅक्सिन ट्रॅकर नावाने एक प्लॅटफॉर्म तयार करेल.

या ट्रॅकरमध्ये लस घेणाऱ्यांची संपूर्ण माहिती असेलच, शिवाय कोरोना संसर्गाची तपासणी करणाऱ्यांचीही माहिती उपलब्ध असेल. आतापर्यंत ज्यांनी लस घेतली आहे त्यांची माहितीही या ट्रॅकरमध्ये उपलब्ध असेल. आतापर्यंत देशात ५४ कोटींपेक्षा जास्त लोकांना पहिला डोस, तर १६ कोटींपेक्षा जास्त लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्याशिवाय ५३ कोटींपेक्षा जास्त लोकांची कोरोना तपासणी झालेली आहे.

नव्या पोर्टलवर डेटाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अनेक फिल्टर लावले जाणार
आयसीएमआरद्वारे स्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र अरोरा यांनी सांगितले की, तिन्ही पोर्टल विलीन करून जे नवे पोर्टल बनवले जाईल त्याचा हेतू लसीकरणानंतर संसर्गाची माहिती एकत्र करणे हा असेल. लसीकरणानंतर कोणी आरटीपीसीआर तपासणी करून घेत असेल तर त्याची माहिती पोर्टलवर येईल. नंतर त्याला रुग्णालयात जावे लागले तर उपचाराचा तपशीलही पोर्टलवर येईल. एकाच व्यक्तीचा डेटा रिपिट होऊ नये यासाठी तिन्ही पोर्टलच्या डेटाला मोबाइल नंबर, आयडी प्रूफ नंबर आणि वडिलांचे नाव यांसारख्या अनेक फिल्टरद्वारे तपासले जाईल. म्हणजे कोणी लसीकरण, त्यानंतर आरटीपीसीआर तपासणीत मोबाइल नंबर, आयडी प्रूफ वेगवेगळे वापरले तरीही वडिलांच्या नावावरून ओळख पटेल.

सध्या ३ वेगवेगळ्या पोर्टलवर लस, कोरोना तपासणी आणि हॉस्पिटलायझेशनचा डेटा लसीकरण : लोकांच्या लसीकरणाची संपूर्ण माहिती कोविन पोर्टलवर एकत्र होते. कोरोना तपासणी : आरटी-पीसीआर तपासणीचा संपूर्ण डेटा आयसीएमआरच्या पोर्टलवर एकत्र होतो. चाचणी पॉझिटिव्ह आलेल्यांचा पूर्ण तपशील असतो. हॉस्पिटलायझेशन : पॉझिटिव्ह रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यास त्याचा तपशील एनसीडीसीच्या कोविड-१९ पोर्टलवर जातो. रुग्णालये आणि आयडीएसपीकडून रुग्णांची माहिती येते.

कोरोना तपासणीनंतर क्यूआर कोडयुक्त प्रमाणपत्र देण्याची तयारी
आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना तपासणीचे क्यूआर कोडयुक्त प्रमाणपत्र देण्याची तयारी आहे. कोरोना तपासणी प्रमाणपत्र असे असावे, ज्याची सत्यता राष्ट्रीय स्तरावर तपासता यावी, असा दुबई सरकारचा आग्रह होता. प्रमाणपत्रावर पासपोर्ट क्रमांक द्यावा, अशी सूचना एनएचएच्या सीईओंनी केली. त्याला आयसीएमआरच्या संचालकांची सहमती आहे.

बातम्या आणखी आहेत...