आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र सरकारने कोरोनाव्हायरस लसच्या 1 कोटी 50 लाख डोसची पहिली ऑर्डर दिली आहे. 1 कोटी 10 लाख डोस पुण्याच्या सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया (SII)कडून खरेदी केले जातील, तर 38 लाख 50 हजार डोसची ऑर्डर हैदराबादच्या भारत बायोटेकला दिली आहे. लसीची पहिली खेप 14-15 जानेवारीपर्यंत सर्व सेंटर्सवर पोहोचेल.
भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सरकारी कंपनी एचएलएल लाइफकेयर सरकारच्या वतीने लसीचे डोस खरेदी करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार कोविशील्डची किंमत 220 रुपये प्रति डोस, तर कोव्हॅक्सिनचा एक डोस 309 रुपयांना असेल. यामध्ये सर्व करांचा समावेश आहे. सरकार एप्रिल महिन्यात सीरमकडून कोविशील्डचे आणखी 4 कोटी 50 लाख डोस खरेदी करणार आहे.
पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाणार आहे. यानंतर 27 कोटी उच्च जोखमीच्या गटात समाविष्ट असलेल्या लोकांना ही लस मिळेल. या गटात, 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि तसेच जास्त जोखीम असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल. दरम्यान पहिल्या टप्प्यात ही लस विनामूल्य दिली जाईल आणि संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
कसौली येथील सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीने (CDL) सीरम इन्स्टिट्यूटमध्ये बनवलेल्या 6 कोटी डोस मनुष्यांवर वापरण्यास परवानगी दिली आहे. सर्व प्रथम, त्यांना पुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर CDL ने कोव्हॅक्सिनच्या 2.4 लाख डोसलाही मंजुरी दिली आहे. ड्रग रेग्युलेटरने 3 जानेवारी रोजी कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन ला आपत्कालीन मंजुरी दिली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.