आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vaccine Update Phase III Trials Of Oxford Vaccine Likely To Begin On August 22 In India

व्हॅक्सीन अपडेट:आजपासून देशात ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या व्हॅक्सीनचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल , 20 ठिकाणी 1600 जणांना दिली जाईल लस

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिसऱ्या ह्यूमन ट्रायलच्या पहिल्या दिवशी 100 जणांना व्हॅक्सीन दिले जाईल
  • भारत आणि इतर गरीब 92 गरीब देशांना फक्त 225 रुपयांत मिळेल 'कोव्हिशील्ड' व्हॅक्सीन

भारतात ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या व्हक्सीनचे तिसरे ट्रायल आजपाासून(दि. 22) सुरू होत आहे. देशभरात 20 ठिकाणी व्हॅक्सीनचे ट्रायल होईल. यात मुंबई, पुणे, अहमदाबाद सामील आहेत. ट्रायलमध्ये 1600 जणांना सामील केले जाईल. तर, पहिल्या दिवशी 100 जणांना लस दिली जाईल.

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि एस्ट्रा जेनेकाच्या व्हॅक्सीनचे ट्रायल भारतातील सीरम इंस्टीट्यूट करत आहे. भारतात ही व्हॅक्सीन कोव्हिशील्ड नावाने लॉन्च होत आहे. सीरम इंस्टीट्यूटच्या प्रवक्त्यांनी सांगितल्यानुसार, देशभरातील 20 ठिकाणी व्हॅक्सीनचे ट्रायल होईल, यात कोरोनाचे पाच हॉटस्पॉट ठिकाणांचा समावेश आहे.

मोठ्या स्तरावर होईल ट्रायल

नॅशनल बायोफार्मा मिशन अँड ग्रँड चॅलेंज इंडिया प्रोग्रामअंतर्गत सरकार आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनदरम्यान एक करार झाला आहे. या अंतर्गत व्हॅक्सीनचे मोठ्या स्तरावर परीक्षण होईल. यासाठी अनेक इंस्टीट्यूटची निवड झाली आहे.

व्हॅक्सीनचे 50 टक्के डोज भारतासाठी असतील

कंपनीचे सीईओ अडार पूनावाला म्हणाले की, ट्रायल यशस्वी झाल्यास 2021 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत 30 ते 40 कोटी डोज तयार होतील. व्हॅक्सीन या वर्षीच्या अखेरपर्यंत येईल. व्हॅक्सीनच्या एका डोजची किंमत एक हजार किंवा त्यापेक्षा कमी असेल. या व्हॅक्सीनचा पुरवठा भारतासह 60 देशात केला जाईल. कंपनीकडून तयार केलेल्या व्हॅक्सीनपैकी 50 टक्के व्हॅक्सीन भारतासाठी असतील.

225 रुपयात मिळेल लस

सीरम इंस्टीट्यूटकडून एक बातमी आली होती की, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि व्हॅक्सीन अलायंस संस्था गावीसोबत एक करार केला आहे. या करारा अंतर्गत भारत आणि इतर 92 गरीब देशांना व्हॅक्सीन फक्त 3 डॉलर म्हणजेच, 225 रुपयात दिली जाईल.