आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतात कोविशील्ड व कोव्हॅक्सिननंतर तिसऱ्या लसीचा मार्ग मोकळा झाला आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) तज्ञ समितीने स्पुटनिक-व्ही या रशियन लसीच्या आपत्कालीन वापराची शिफारस केली. आता ड्रग्स कंट्रोल ऑफ इंडिया (डीसीजीआय) अंतिम निर्णय घेईल. एक-दोन दिवसांत त्यास मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी या औषध निर्मात्या कंपनीने गेल्याच आठवड्यात स्पुटनिक-व्हीच्या मंजुरीसाठी अर्ज दिला होता. रशियात तिसऱ्या टप्प्याच्या वैद्यकीय चाचणीत ती ९१.६ % प्रभावी असल्याचे सांगण्यात आले. भारतात तिच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी १६०० जणांवर करण्यात आली. तिचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.
कोरोनावरील गुजरातचे दावे वस्तुस्थितीपेक्षा विपरीत : हायकोर्ट
गुजरात हायकोर्टाने वाढत्या कोरोना संकटावरून राज्य सरकारला फटकारले आहे. कोर्टाने एका जनहित याचिकेची स्वत: दखल घेताना म्हटले की, ‘आपण देवाच्या दयेवर आहोत, असा विचार लोक आता करत आहेत.’ सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती अॅडव्होकेट जनरल कमल त्रिवेदी यांनी दिली. त्यानंतर न्यायालयाने म्हटले, ‘तुम्ही जो दावा करत आहात, त्यापेक्षा स्थिती खूप वेगळी आहे. सर्वकाही ठीक आहे असे तुम्ही म्हणत आहात, पण वस्तुस्थिती त्यापेक्षा विपरीत आहे.’
कोविशील्ड
70.4% प्रभावी (भारतात)
डोस : दोन (दुसरा डोस सहा ते आठ आठवड्यांत. साठा २ ते ८ अंशावर. किंमत २५० रुपये.
स्पुटनिक-व्ही
91.6% प्रभावी (रशियात)
डोस : दोन (दुसरा डोस २१ व्या दिवशी), साठा २ ते ८ अंशांवर. किंमत ठरली नाही. ७०० रु.त शक्य
कोव्हॅक्सिन : 81% प्रभावी (भारतात)
डोस : दोन(दुसरा डोस २८ दिवसांनी), साठा २ ते ८ अंशांवर. किंमत २१० रुपये.
चार आणखी लसी याच वर्षी...
1. जॅनसीन : जॉन्सन कंपनी. अॉगस्टपर्यंत येणार.
2. झायकोव्ह-डी : झायडस कॅडिला, अॉगस्टपर्यंत.
3. नोव्हाव्हॅक्स: नोव्हाव्हॅक्स कंपनी. सप्टेंबरपर्यंत येणार.
4. नेझल व्हॅक्सिन : भारत बायोटेक, अॉक्टोबरपर्यंत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.