आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड झाल्याच्या ३-४ आठवड्यांत व्यक्ती पूर्णपणे बरी आणि पूर्ववत होते. परंतु एखाद्या व्यक्तीमध्ये ३-४ आठवड्यांनंतरही कोविडची लक्षणे दिसल्यास त्याला पोस्ट कोविड म्हटले जाते. प्रत्येकी १०० पैकी १० व्यक्तींना ही समस्या असल्याचे मानले जाते. ही स्थिती तीन महिन्यांहून जास्त काळ राहिल्यास त्यास लाँग कोविड म्हटले जाते, अशी माहिती डॉ. चंद्रकांत लहारिया यांनी वेबिनारमध्ये दिली. डॉ. लहारिया म्हणाले, पोस्ट, लाँग कोविड ही वास्तविक आव्हाने आहेत. तुम्हाला त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे लस होय. लसीने संसर्गापासून संरक्षण होत नाही. परंतु त्यामुळे कोविडचा प्रभाव कमी होतो.
दैनिक भास्करने आपल्या वाचकांसाठी एक वेबिनार सिरीज आयोजित केली आहे. त्यात आरोग्य, करिअर, लाइफस्टाइल क्षेत्रातील तज्ज्ञांना निमंत्रित केले जाते. वेबिनारचे पहिले पुष्प ब्रह्मकुमारी शिवानी व दुसरे पुष्प सुपर-३० फेम आनंदकुमार यांनी गुंफले होते. शनिवारी तिसरे पुष्प आयोजित केले गेले. त्यात डॉ. चंद्रकांत लहारिया यांनी ‘कोविडनंतरचे त्रास व आरोग्य कसे राखावे?’ या विषयावर मार्गदर्शन केले. देशभरातील वाचकांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.