आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vaccines For Children । Coronavirus । Covid 19 । Pfizer And Zydus Vaccines; News And Live Updates

कोरोनादरम्यान दिलासादायक बातमी:AIIMS संचालक म्हणाले - भारतात सप्टेंबरपर्यंत लहान मुलांना लस मिळण्याची शक्यता, यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मिळेल मदत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक लसींना मान्यता मिळण्याची शक्यता

देशात कोरोनाची दुसरी लाट पुन्हा वाढताना दिसत आहे. देशात सध्या 18 वर्षांवरील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. परंतु, कोरोनाचा लहान मुलांवरील धोका कायम आहे. परंतु, सध्या देशातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

भारतात सप्टेंबरपर्यंत लहान मुलांना कोरोनाची लस मिळण्याची शक्यता एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की, देशात ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत तीन लस कंपन्यांना मान्यता मिळण्याची आशा आहे. यामुळे लहान मुलांवरील धोका कमी होणार असून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत मिळेल असेही ते म्हणाले.

अनेक लसींना मान्यता मिळण्याची शक्यता
एनडीटीव्हीच्या हवाल्याने डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, झायडसने चाचणी पूर्ण केली असून त्याला आपत्कालीन अधिकृततेची प्रतिक्षा आहे. यावितिरिक्त भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन चाचणीदेखील ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) फायझर लसीला यापूर्वीच मंजूरी दिली आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होऊ शकते असे गुलेरिया म्हणाले.

देशात 42 कोटी लोकांचे लसीकरण
देशातील लसीकरणाचा आकडा 42 कोटींवर गेला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील 42.34 कोटी लोकांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 54.76 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाची सुरुवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...