आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगाने नवीन वर्षात प्रवेश केला आहे. या वर्षात तरी जगभरात शेवटच्या व्यक्तीपर्यंत लसीचा डोस पोहोचवता येईल का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कमी उत्पन्न असलेल्या २५ देशांत ४० टक्क्यांहून कमी लसीकरण झाले आहे. निम्न मध्य उत्पन्न गटातील ५५ देशांपैकी ३५ देशही उद्दिष्टापासून लांब आहेत. केवळ २० देशांत ४० टक्क्यांहून जास्त लसीकरण होऊ शकले. उच्च-मध्यम उत्पन्न असलेल्या ५० पैकी २६ देशांना ४० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठू शकले आहेत. उच्च उत्पन्न गटातील ६१ पैकी ६० देशांत लसीकरण ४० टक्क्यांहून जास्त आहे. त्यापैकी ३१ देशांत तर ७० टक्क्यांहून जास्त लोकसंख्येचे लसीकरण आटोपले आहे. यूएईमध्ये ९१ टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
उद्दिष्ट : २०२२ मध्ये १००% उद्दिष्टपूर्ती अशक्य
सप्टेंबर २०२२ मध्ये ७० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. परंतु २०२१ मध्ये ४० टक्के लोकसंख्येचे लसीकरण व्हायला हवे होते. तसे झाले असते तर कदाचित ही स्थिती गाठता आली असती, असे ड्यूक विद्यापीठातील ग्लोबल हेल्थ सेंटरचे कृष्ण उदयकुमार यांनी सांगितले. ९० देशांमध्ये लसीकरणाचे हे उद्दिष्ट गाठता येऊ शकले नाही. म्हणूनच परिस्थिती चिंताजनक आहे. त्यातूनच प्राण गमवावे लागत आहेत.
चूक : कोवॅक्सचा निधी वेळेत हवा होता..
कोवॅक्सला सुरुवातीपासून निधी उभारता आला असता तर गरीब देशांत लसींचा योग्य पद्धतीने पुरवठा झाला असता. २०२० पर्यंत २.४ अब्ज निधी उभारणीसाठी खूप काळ लागला. त्यात रोखीने ४०० दशलक्ष रक्कम होती. त्यानंतर वेगाने लसींची निर्मिती करणाऱ्या संयंत्राना निश्चित करून तसे उत्पादन करता येऊ शकले असते.
समस्या : लसीवर मूठभरांच्या वर्चस्वामुळे नुकसान
गरीब देशांपर्यंत लसीचा डोस पोहोचवण्यासाठी कोवॅक्स नसता तर परिस्थिती आणखी वाईट झाली असती. या कार्यक्रमाद्वारे १४० हून जास्त देशांना ८० कोटी डोस मिळाले आहेत. परंतु लसींवरील श्रीमंत देशांचे वर्चस्व असल्यामुळे हा कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे प्रभाव दाखवू शकला नाही. सुरुवातीला डोस केवळ श्रीमंत देशांसाठी होती. आता डोस मिळत असले तरी त्याचा वेग खूप मंद आहे.
उपाय : गरीब देशांत निर्मितीचा मार्ग मोकळा व्हावा
आता लसींची निर्मिती उच्च उत्पन्न असलेल्या देशांसोबतच भारत व चीनमध्येही केले जात आहे. या ठिकाणी लस उपलब्ध होण्याचे प्रमाण चांगले राहिले. दान केलेली लस हा अल्पकालीन उपाय ठरतो. आता गरीब देशांत लस निर्मितीला सुरुवात व्हावी. सोबतच श्रीमंत देशांनी आधीच खरेदी केलेल्या लसींना दान करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.