आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरण पटेलनंतर गुजरातचा आणखी एक ठकसेन अटकेत:CMO अधिकारी असल्याचे सांगून करायचा फसवणूक, मुंबईच्या मॉडेलवर बलात्काराचा आरोप

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करत सुरक्षा यंत्रणांनाच फसवणाऱ्या किरण पटेलनंतर आता गुजरातमधील आणखी एका महाठकाची पोलखोल झाली आहे. विराज अश्विन शाह असे या महाठकाचे नाव असून तो गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत होता. वडोदरा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

विराज शाहने सीएमओचा अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील एका मॉडेलला गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीची अँबेसॅडर बनवण्याचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कारही केल्याचे समोर आले आहे.

याविषयी डी डिव्हिजनचे एसीपी एव्ही काटकडेंनी माहिती देताना सांगितले की, तीन-चार दिवसांपूर्वी मुंबईतील मॉडेल विराज शाहसह मुंबईहून वडोदऱ्यात आली होती. तिला विराजने तो सीएमओ अधिकारी आणि गिफ्ट सिटीचा अध्यक्ष असल्याचे सांगितले होते. गिफ्ट सिटीचा ब्रँड अँबेसॅडर बनवण्याचे आमिष त्याने त्या मॉडेलला दिले होते. त्याच्या भूलथापांना बळी पडत ती मॉडेल वडोदऱ्यात आली होती.

यानंतर विराजने तिला लग्नाचे आमिष दाखवत हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. या हॉटेलमध्ये त्याचे एका व्यक्तीसोबत भांडण झाल्यावर त्याची पोलखोल झाली. यानंतर मॉडेलने गोत्री ठाण्यात विराजविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करत सर्व कहाणी पोलिसांना सांगितली. मॉडेलच्या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी त्याला अटक केली.

नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक करायचा

एसीपी एव्ही काटकडेंनी दिलेल्या माहितीनुसार विराज सीएमओमध्ये काम करत नाही, तसेच तो गिफ्ट सिटीचा अध्यक्षही नाही. तो स्वतःला सीएमओचा अधिकारी असल्याचे सांगत नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक करायचा. अटकेनंतर त्याच्याकडून फसवलेले लोक तक्रार दाखल करतील अशी पोलिसांना आशा आहे. सध्या पोलिसांनी विराजविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपासास सुरूवात केली आहे.

ही बातमीही वाचा...

महाठक:किरण पटेलची अनेक कारस्थाने उघडकीस, काश्मिरातील मोठ्या अधिकाऱ्यांना कोट्यवधींना गंडवले

स्वत:ला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगून जम्मू-काश्मिरात झेड प्लस संरक्षण मिळवणारा किरण पटेल गुजरात पोलिसांच्या कोठडीत आहे. तथापि, जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या कारनाम्यांची मोठी यादीच तयार झाली आहे. असे म्हटले जाते की, किरणबाबत जी माहिती समोर आली आहे ती वरवरची आहे. खरी कथा तर वेगळीच आहे.​​​​​​​ (वाचा पूर्ण बातमी)