आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपती:वैकुंठ एकादशीला उत्तर द्वारात भगवंत दर्शन...

बीएसएन रेड्डी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुपती छायाचित्र आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती मंदिराचे आहे. पुराणात वैकुंठ एकादशीला भगवंताचे उत्तरेकडील द्वारातून दर्शनाचे माहात्म्य सांगण्यात आलेले आहे. ही परंपरा आहे. यानिमित्त सोमवारी श्री वेंकटेश्वरस्वामींची स्वारी श्रीदेवी भूदेवीच्या सुवर्णरथातून निघाली. त्या वेळी चारही बाजूंनी एक लाखावर भाविकांची गर्दी झाली होती. भाविकांना ११ जानेवारीपर्यंत दर्शन करता येणार आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमचे चेअरमन वाय.व्ही. सुब्बा रेड्डी दैनिक भास्करला म्हणाले, वैकुंठ एकादशी द्वार दर्शनासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. या काळात कोणत्याही शिफारशीवरील दर्शनास मनाई असेल. यानिमित्ताने सामान्य लोकांना दर्शनाची परंपरा कायम ठेवली जाईल.

पुढेही मंदिर खुले राहणार : अध्यक्ष सुब्बा रेड्डी म्हणाले, मंदिर सहा महिन्यांसाठी बंद राहणार असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांतून आले होते. परंतु माहिती चुकीची आहे. अशी काहीही योजना नाही. गर्भगृहावर सोन्याचा पत्रा लावला जाणार असल्याने गर्भगृह दर्शन बंद होणार असल्याचे ते वृत्त होते.

बातम्या आणखी आहेत...