आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैशाखातील धर्म-कर्म:या महिन्यात स्नान-दानासोबतच भगवान विष्णूंची पूजा करण्याचेही विधान, यामुळे मिळते तीर्थयात्रा आणि यज्ञांचे पुण्य

23 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

30 मे पर्यंत वैशाख मास असेल. या काळात भगवान श्रीविष्णूंची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. स्कंद पुराणानुसार वैशाख महिन्यात स्नान-दान, भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केल्याने कळत-नकळतपणे झालेली सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. पद्म आणि विष्णु धर्मोत्तर पुराणात असेही म्हटले आहे की वैशाख महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते.

स्नान आणि जलदानाचे विशेष महत्त्व
वैशाख महिन्याचे वर्णन स्कंद, पद्म, ब्रह्मवैवर्त पुराण आणि महाभारतात अतिशय विशेष केले आहे. वैशाख महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान, जलदान आणि तीर्थस्थळावरस्नान केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात, असे या ग्रंथांमध्ये सांगितले आहे. वैशाख महिन्यात या गोष्टी केल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते. वैशाख महिन्याचे दैवत स्वतः भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या महिन्यात त्यांची पूजा केल्याने अनंत शुभ फल प्राप्त होतात.

अशाप्रकारे करावी भगवान विष्णूंची पूजा

 • सूर्योदयापूर्वी उठून गंगेचे पाणी किंवा कोणत्याही पवित्र नदीचे पाणी पाण्यात मिसळून स्नान करावे. त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे.
 • भगवान विष्णूंची पूजा करण्याचा संकल्प घ्यावा. पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करून घेतल्यास ते जास्त तर बरे होईल.
 • भगवान विष्णूंना पंचामृताने स्नान घालावे. चरणामृत घ्यावे. पूजा करताना ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा.
 • देवाला फुले अर्पण करावीत. धूप-दीप लावावा. नैवेद्य दाखवावा. दिवा लावून आरती करावी.
 • विष्णु सहस्रनामाचा जप करावा. व्रताची कथा ऐकावी. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि दान करून आशीर्वाद घ्यावा.

हे शुभ काम देखील करू शकता

 • सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा.
 • भगवान विष्णूंसोबत देवी महालक्ष्मीचीही पूजा करावी.
 • देवळात जाऊन ध्वज म्हणजेच झेंडा किंवा पाण्याने भरलेले भांडे दान करा.
 • महादेवासमोर दिवा लावावा आणि 108 वेळा श्रीराम नामाचा जप करावा.
 • शिवलिंगाला जल आणि काळे तीळ अर्पण करावेत.
बातम्या आणखी आहेत...