आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vaishnadevi Temple To Remain Closed Till July 31, Now Only 5,000 Devotees Are Allowed To Visit Daily

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळ:31 जुलैपर्यंत वैष्णाेदेवी मंदिर बंद राहणार, आता रोज केवळ 5 हजार भाविकांनाच दर्शनाची मंजुरी, मार्गावर सॅनिटायझरची व्यवस्था

जम्मूहून अमित कुमार निरंजन10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वैष्णाेदेवी यात्रेतील न्यू नाॅर्मल : ऑनलाइन नोंदणी अनिवार्य, मोबाइल अॅपही लवकरच येणार,

श्री माता वैष्णाेदेवी मंदिराचा तळ म्हणजे कटरा अलीकडच्या दशकात कधीही थांबले नसावे. या छाेट्या शहरात सतत वर्दळ पाहायला मिळते. परंतु, काेराेनामुळे १०० दिवसांपासून परिसरात सन्नाटा पसरला आहे. म्हणूनच स्थानिक प्रशासनाने ३१ जुलैपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नवीन व्यवस्था बनवली जात आहे. बोर्डाचे सीईआे रमेश कुमार म्हणाले, दर्शनासाठी कटरापूर्वीच ऑनलाईन नाेंदणी करावी लागेल. दररोज किमान पाच ते सात हजार लोकांना दर्शनाची परवानगी असेल.रमेश कुमार म्हणाले, आम्ही तयारी केली आहे. दरराेज पाच ते सात हजार लाेकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. सर्वांची स्क्रीनिंग हाेणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंगमध्ये दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील पुजारी भाविकांना थेट टिळा लावणार नाहीत. मार्गावर किमान अर्धा डझन पाॅइंटवर सॅनिटाइझचे केंद्र तयार केले जाणार आहेत. दर्शनासाठी कटराला येण्यापूर्वी आधी आॅनलाइन नाेंदणी करावी लागणार आहे. आता मंदिर सुरू करण्याची परवानगी प्रशासन कधी देते यावर सर्वकाही अवलंबून आहे.

दरम्यान, येथे सुकामेवा विक्रेत्या दुकानांची संख्या ४०० हून जास्त आहे. व्यापाऱ्यांनी सुकामेवा खराब हाेण्यापासून वाचवण्यासाठी शीतगृहात पाठवला आहे. काेल्ड स्टाेरेजमध्ये पाठवलेला हा माल किमान ३०० काेटी रुपयांचा असावा असा अंदाज आहे. एक ट्रक माल एक महिना काेल्ड स्टाेरेजमध्ये ठेवण्याचे भाडे ३५ ते ४० हजार रुपये माेजावे लागते. त्याशिवाय ट्रकचे ५ हजार रुपये भाडे वेगळे. अशा प्रकारे दुहेरी संकट आहे.

क्षेत्राचे दरराेजचे सुमारे ४०० ते ५०० काेटींचे उत्पन्न आता बुडाले

देशाच्या कानाकाेपऱ्यातील सुमारे ४० हजारांवर लाेक येथे दर्शनासाठी येतात. मे-जूनमध्ये ही संख्या सर्वाधिक असते. या दरम्यान सुमारे २० लाख लाेक येतात आणि दरराेज १०-१२ काेटी रुपयांची उलाढाल हाेते. दर्शन बंद झाल्यामुळे त्रिकुटा डाेंगरावरील चहाची दुकाने, ढाबे, हाॅटेल्स, वाहतुकीशी संबंधित लाेकांचे हाल सुरू आहेत. कटरा हाॅटेल असाेसिएशनचे अध्यक्ष राकेश वजीर म्हणाले, यात्रा बंद झाल्यामुळे हाॅटेल क्षेत्राचे दरराेजचे सुमारे ४०० ते ५०० काेटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. ड्रायफ्रूट्सची दुकाने कटराचा आर्थिक कणा मानला जाताे. ही बाजारपेठही बंद आहे.

५०० वर्षांपासून शिवधर यांचे वंशज करताहेत पूजा

वैष्णोदेवी मंदिरात पूजा-अर्चनेच काम सुरूच आहे. त्याचे थेट प्रसारणही सुरू आहे. ही पूजा बाबा शिवधर यांचे वंशज ५०० वर्षांपासून करत आहेत. पुजारी सुदर्शन म्हणाले, यापूर्वी आम्ही आमच्या पूर्वजांकडून कधीही महामारीमुळे दर्शनसाठी चढाई थांबवल्याचे ऐकले नव्हते. एवढेच नव्हे तर भारत-पाकिस्तान युद्ध काळातही मातेचा दरबार भाविकांसाठी बंद नव्हता.

बातम्या आणखी आहेत...