आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हरिद्वार कुंभमेळ्याआधी वृंदावनमध्ये पारंपरिक कुंभ-पूर्व वैष्णव बैठक रविवारी कुंभ संक्रांतीपासून सुरू होत आहे. ४० दिवस यमुनातीरी भरणाऱ्या साधू-संतांच्या या समागमाला वैष्णवी कुंभ किंवा लघुकुंभ म्हणून आेळखले जाते. बाराव्या वर्षी सर्व वैष्णवी संप्रदायांचे साधू-संत व आखाडे हरिद्वार कुंभमेळ्याआधी वृंदावनमध्ये जमतात आणि हरिद्वार कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही स्नानाआधी येथून हरिद्वारकडे प्रस्थान करण्याची परंपरा आहे. येथे निंबार्कनगर, गौडियानगर, वल्लभनगर, विष्णुस्वामीनगरसारखी शिबिरे आहेत. तिन्ही आखाडे त्यांच्या ध्वजांसह शिबिर लावत आहेत. वसंत पंचमीला (१६ मार्च) वृंदावनमध्ये सर्व संप्रदाय आणि आखाड्यांचे सेवेदार आणि आचार्यांची वाजतगाजत शोभायात्रा निघेल व प्रथम स्नान होईल. पहिले शाही स्नान माघ पौर्णिमा (२७ फेब्रुवारी), दुसरे फाल्गुन कृष्णा एकादशी (९ मार्च), तिसरे अमावास्या (१३ मार्च) आणि शेवटचे रंगभरणी एकादशीला (२५ मार्च) होईल. वैष्णवांच्या निंबार्क संप्रदायाशी संबंधित व प्रवचनकार गोपालजी यांनी सांगितले की, हरिद्वार कुंभमेळ्यात पहिल्या स्नानासाठी नेहमीच वैष्णव आणि संन्यासींमध्ये संघर्ष होत असतो, अनेकदा नरसंहारही झाला. त्यानंतर वैष्णवांनी हरिद्वारात कुंभस्नान बंद केले. सुमारे २९८ वर्षांपूर्वी १७२३ मध्ये वैष्णवांनी कुंभाचे आयोजन केले आणि त्याला वैष्णव बैठकीचे नाव दिले. इंग्रज राजवटीने सर्व संप्रदाय व मतांच्या संतांच्या संमतीने १८७९ मध्ये हरिद्वार कुंभमेळ्यात शाही स्नानाचा क्रम ठरवला. त्यानंतर वैष्णवी साधू संत व आखाडे पुन्हा हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी होऊ लागले. मात्र, वृंदावनातही आयोजन सुरूच राहिले. त्यांनी सांगितले की, वृंदावनच्या कुंभमेळ्याला केवळ या घटनेशी जोडणे पूर्णपणे योग्य नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.