आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vaishno Devi 13,000 Devotees In One Day For The First Time In The Corona Period;

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैष्णोदेवी:कोरोनाकाळात पहिल्यांदाच एका दिवसात 13 हजार भाविक; नवीन वर्षात निर्बंध उठणार, भाविक वाढण्याची शक्यता

कटरा |मोहित कंधारी ​​​​​​​4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिकूट पर्वतावर रविवारी हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली. - Divya Marathi
त्रिकूट पर्वतावर रविवारी हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली.
  • नऊ महिन्यांनंतर जम्मू-काश्मीरच्या वैष्णोदेवी मंदिरात पुन्हा गजबज, बाजारात वर्दळ वाढली

देशात कोरोना नियंत्रणात येत आहे. लसीकरणही लवकर सुरू होईल. याबरोबर धार्मिक पर्यटनानेही वेग घेतला आहे. कोरोनाकाळातील नऊ महिन्यांनी प्रथमच जम्मू-काश्मिरातील वैष्णोदेवीचा दरबार गजबजला आहे. स्थानिक बाजारात वर्दळ दिसत आहे. येथील बेस कॅम्पच्या नोंदणी काउंटरवर तीन दिवसांत भाविकांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. २३ डिसेंबरला ६५०० पेक्षा जास्त भाविकांनी विशेष पूजा केली. २५ डिसेंबरला संध्याकाळी हा आकडा दहा हजारांच्या पुढे गेला. २७ डिसेंबरला तर कोरोनाकाळातील सर्वाधिक १३ हजार भाविक दर्शनासाठी आले. गर्दी बघून लवकरच आधीचे दिवस परततील, अशी आशा टूर ऑपरेटर व हॉटेल व्यवसायाला आहे.

कोरोनामुळे ऑनलाइन नोंदणीद्वारेच यात्रेला परवानगी दिली होती. १ नोव्हेंबरपासून रोज १५ हजार लोकांची मर्यादा होती. गर्दी वाढल्याचे बघून श्राइन बोर्डाने स्थानिक भाविकांसाठी जागेवरच नोंदणी सुरू केली. मात्र, आंतरराज्य बससेवा सुरू नसल्याने व मर्यादित रेल्वेगाड्या असल्याने भाविकांना येता येत नव्हते. भाविकांच्या संख्येवरील मर्यादा उठवण्याचे आवाहन कटरा हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश वझीर यांनी केले आहे. नियमित रेल्वेसेवा सुरू झाल्याने भाविक वाढण्याची आशा आहे. नवीन वर्षात रेल्वे आणखी पाच गाड्या सुरू करत आहे. वझीर यांनी सांगितले की, सध्या भाविक एका दिवसात परतत आहेत. मोजकेच हॉटेलमध्ये थांबत आहेत. हॉटेलचे पर्यवेक्षक अंकुशकुमार सांगतात, रोज लोकांचे फोन येत आहेत. त्यांना यायचे आहे, मात्र बससेवा नसल्याने येऊ शकत नाहीत, तर श्राइन बोर्डाचे सीईओ रमेशकुमार यांनी सांगितले की, नवीन वर्षानिमित्त विशेष पूजेसाठी सरासरी ५० हजार भाविक यायचे. घरूनच आरतीच्या लाइव्ह दर्शनासाठी मोबाइल अॅप व प्रसादाची होम डिलिव्हरीची सोय करण्यात आली होती. आतापर्यंत १५ हजार पाकिटांची डिलिव्हरी करण्यात आली आहे.

त्रिकूट पर्वतावर रविवारी हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली. सायंकाळी ५.३० वाजता सुरू झालेली बर्फवृष्टी अर्धा तास सुरू होती. मात्र, याचा दर्शनव्यवस्थेवर काहीही परिणाम झाला नाही. तिकडे सिमल्यातही हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली.

बातम्या आणखी आहेत...