आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमधील कटारा येथे वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंरगीमुळे 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. नववर्षाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्यात शनिवारी रात्री 2.45 दरम्यान चेंगराचेंरगीची घटना घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या आठ जणांची ओळख पटली असून, ते हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर येथील रहिवासी आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने आदेश दिले आहेत.
दरम्यान या घटनेचे प्रत्यक्षदर्शी हिमांशु अग्रवालने या घटनेची कहानी सांगितली आहे. हिमांशु हे हरियाणा राज्यातील पानीपत येथील खैल बाजार येथील रहिवासी असून, आपले मित्र राघव, हिमांशू शर्मा, जतिन आणि भारतसोबत दोन दिवसांपूर्वीच वैष्णो देवीच्या दर्शनासाठी आले होते.
देवीचे दर्शन करुन हिमांशू आणि त्याचे मित्र घरी परतत असताना, रात्री सुमारे 2.30-2.45 दरम्यान दर्शनाला जाणारे आणि येणारे सर्व भाविक चेक पोस्ट क्रमांक 3 जवळ जमले होते. त्यामुळे दर्शनासाठी आत जाण्यासाठी किंवा बाहेर येण्यासाठी देखील रस्ता नव्हता. मात्र सुरक्षेसाठी तैनात असलेल्या CRPF च्या जवानांनी अत्यंत बेजबाबदार वृत्ती केल्याचे पाहायला मिळाले.
गर्दीला नियंत्रित करण्याऐवजी CRPF जवानांनी भाविकांना काठ्यांची भीती दाखवून पांगवले. VIP येत आहेत त्यामुळे येथील जागा रिकामी करा, असे CRPF भाविकांनी आरडा-ओरड करुन सांगत होते. मात्र त्याठिकाणी हालचाल करण्याइतकी देखील जागा नव्हती. मात्र CRPF च्या धमक्यांमुळे भाविक कसेबसे करुन मागे-पुढे हालचाल जात होते. मी आणि माझे मित्र देखील त्याच रांगेत थांबलो होतो.
रांगेत माझ्या समोर उभा असलेला एक व्यक्ति जमिनीवर पडला. त्याला उठवण्यासाठी दोन जणांनी प्रयत्न केले मात्र, त्यादरम्यान त्या दोघांना मागून धक्का लागला. त्यामुळे ते दोघेही त्या खाली पडले. त्यानंतर CRPF च्या जवानांच्या मारहाणीच्या भितीने भाविक पळायला लागले. त्यानंतर चेंगराचेंरगीस सुरुवात झाली. मी आणि माझे मित्र पोलावर चढून बसलो होतो. सुमारे 15 मिनट मंदिर परिसराती चेंगराचेंरगीचे दृश्य होते. त्यानंतर CRPF च्या टीमने लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. वातावरण शांत झाल्यानंतर मी आणि माझे मित्र पोलावरुन खाली उतरलो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.