आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैष्णोदेवी मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या आढाव्यासाठी रविवारी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली राजभवनात श्री माता वैष्णोदेवी देवस्थान बोर्डाची बैठक झाली. यात भाविकांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपराज्यपाल बोर्डाचे अध्यक्षही आहेत. या बैठकीत चेंगराचेंगरीच्या कारणांचा मागोवा आणि दुर्घटनेनंतर व्यवस्थापनाने त्वरित केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
तथापि, गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना कडक शब्दांत खडसावण्याऐवजी बैठकीत देवस्थान बोर्ड, जिल्हा प्रशासन आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतकार्याचे कौतुक करत त्यांना पाठीशी घातले गेले. सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचू शकले, अशी शाबासकी या वेळी देण्यात आली. बैठकीत देवस्थान कमिटीच्या सीईओंना गर्दीचे व्यवस्थापन आणि सुविधांत वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच यात्रेचे बुकिंग पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने करण्यास सांगण्यात आले. तसेच मंदिर परिसरातील गर्दी कमी करणे, भवनात प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गासह संपूर्ण यात्रा मार्ग नियोजनपूर्वक व्यवस्थित करण्याचे निर्देश देण्यात आले.
चौकशी समितीने व्हिडिओ फुटेज, फोटोही मागवले
उच्चाधिकार समितीने सामान्य लोकांकडून घटनेशी संबंधित व्हिडिओ फुटेज आणि फोटो देण्याचे आवाहन केले आहे. समितीने म्हटले की, ज्या लोकांकडे यासंदर्भातील माहिती असेल ते आपले जबाब नोंदवू शकतात. ही सूचना जम्मूचे विभागीय आयुक्त आणि समितीचे सदस्य राघव लंगर यांनी जारी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.