आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानववर्षाच्या पहिल्या दिवशी जम्मूतील रहिवासी क्षेत्रात त्रिकुटा पर्वतावरील माता वैष्णाेदेवी मंदिरात झालेल्या चकमकीच्या घटनेच्या चाैकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष एडीजीपी (जम्मू) व आयुक्त (जम्मू) सदस्य असतील. अनियंत्रित गर्दी हेच चकमकीमागील मुख्य कारण असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. वास्तविक मंदिर व्यवस्थापनाला ही गर्दी नियंत्रित करता येऊ शकली असती. त्यासाठी गर्दीला याेग्य वेळी नियंत्रित करण्याची गरज हाेती. परंतु तसे केले गेले नाही. त्यामुळे यात्रेकरू भवन परिसरातच भाविकांची अलाेट गर्दी झाली हाेती. अरुंद रस्ते असल्यामुळे दाेन्ही बाजूने भाविकांना बाहेर पडायचे हाेते. त्यातूनच ही चकमक झाली. पाेलिसांनी कारवाई सुरू केली तेव्हा परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. त्यातून ही दुर्घटना घडली. गर्दीदरम्यान भांडणाचे प्रसंग घडल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी धक्काबुक्कीही झाली हाेती.
काही प्रत्यक्षदर्शींच्या मते याआधीदेखील गर्दी अनियंत्रित झाली हाेती. परंतु त्या वेळी स्थिती सावरली गेली हाेती. व्यवस्थापन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रात्री दाेन वाजून १५ मिनिटास घडली. काही वेळ यात्रा ठप्प झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुन्हा यात्रा सुरू केली. माता वैष्णाेदेवी भारतात सर्वात प्रतिष्ठित देवालयापैकी आहे. येथे दरराेज हजाराे भाविक पूजेसाठी येतात. मंदिराचे मुख्य पुजारी पंडित सुदर्शन यांनी तीर्थयात्रेकरूंना शांततेचे आवाहन केले आहे.
गुदमरल्याने व एकमेकांना तुडवल्याने मृत्यू
माता वैष्णाेदेवी मंदिरात शनिवारी पहाटे घडलेल्या चकमकीत जखमी चार लाेक जम्मू-काश्मीरच्या कटरामध्ये गंभीर स्थितीत असून व्हेंटिलेटरवर आहेत. श्री माता वैष्णाेदेवी नारायण सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील न्यूराेसर्जन डाॅ. जे.पी. सिंह म्हणाले, आमच्या रुग्णालयात ३ च्या सुमारास पीडित लाेक पाेहाेचले. येथे १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर हाेती. रुग्णालयात दाखल हाेताना ते बेशुद्ध हाेते. अजूनही ते आयसीयूमध्ये आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी शनिवारी या चकमकीनंतरच्या स्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, नूतन वर्षाच्या निमित्ताने वैष्णाेदेवी मंदिरात माेठ्या संख्येने तरुण येत आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रणासाठी नवीन याेजना करावी लागेल. पारंपरिक पद्धतीने भाविक नवरात्र, दसरा, दीपावलीसारख्या सणांना येत हाेते. परंतु आता तरुण वर्ग वाढला आहे. त्यानुसार उपाययाेजना कराव्या लागतील. आम्ही उपाय शाेधण्यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर करणार आहाेत. सरकारने चाैकशीचे आदेश दिले आहेत. पाेलिसांनी पुरेशी व्यवस्था केली हाेती. काय घडले यापेक्षा काय करता येऊ शकेल, यावर आम्ही चर्चा करणार आहाेत. डीजीपी दिलबागसिंह म्हणाले, बहुतांश मृत्यू गुदमरणे व एकमेकांवरून पळाल्याने झाले. त्यात खूप लाेक जखमी झाले.
पाेलिस रात्रीच्या वेळी गर्दीवर लाेकांवर लाठीमार करत हाेते
आम्ही सागररत्नहून जात हाेताे. गर्दी प्रचंड वाढल्याने पाेलिसांनी भाविकांवर लाठीमार सुरू केला हाेता. त्यानंतरही गर्दी नियंत्रणात येत नव्हती. कुणाला तरी लाठीने मारत हाेते. सकाळी झाेपेतून उठल्यावर घटनेची माहिती मिळाली. सरकारने नीटपणे व्यवस्था केली नव्हती असे वाटते. - विवेक, भटिंडा (पंजाब)
धक्क्याने महिला काेसळली, त्यानंतर अनेक लाेक काेसळले
मी रात्री एकच्या सुमारास दर्शन केले हाेते. एक किमीचा भाग बंद हाेता. समाेरून आणि मागूनही लाेकांचे लाेंढे येत हाेते. प्रसाद घेऊन येत हाेताे. त्याच वेळी गर्दीच्या धक्क्याने महिला काेसळली. तिच्यानंतर दहा-बारा लाेकही काेसळले. मी एक खांब धरून स्वत:ला कसेबसे वाचवले. - सचिन (कटराचे रहिवासी)
पाय ठेवायलाही जागा नव्हती, लाेक मुलांना घेऊन परतत हाेते..
मी दिल्लीहून आलाेय. खूप गर्दी हाेती. पाय ठेवायलाही जागा नव्हती. श्वासाेच्छ्वासही कठीण झाला हाेता. काही नियाेजन नव्हते. कारण एकाच वेळी माेठ्या संख्येने भाविकांना साेडण्यात आले हाेते. व्यवस्थापनाने निश्चित संख्येने भाविकांना दर्शनासाठी साेडले पाहिजे. -मोनू (दिल्ली)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.