आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vaishnodevi Darbar Jammu Updates: Shri Vaishnodevi Darbar Decorated With Flowers; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:फुलांनी सजला श्री वैष्णोदेवी दरबार; कटरा बेस कॅम्प, जम्मू विमानतळ, रेल्वेस्थानकावर कोविड चाचणी करणे आवश्यक

जम्मू9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवरात्रीला सुरुवात, कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत 9 दिवस चालेल उत्सव
  • दररोज पंचवीस हजार भाविकांना दर्शन देण्याचा प्रशासनाचा निर्णय

जम्मू येथील नवरात्रोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी त्रिकूट पर्वतावरील वैष्णोदेवीची गुहा आणि पूर्ण प्रांगण विविध १०० प्रकारच्या फुलांनी सजवण्यात आले आहे. वैष्णोदेवी श्राइन बोर्ड प्रशासनाने देखील कोविड- १९ प्रोटोकॉलचे कठोर पालन करत देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात केली आहे.

मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेशकुमार जांगिड यांनी तीर्थमंडळ अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, ग्राउंड झीरोपासूनच कोविड प्रोटोकॉल अंतर्गत सर्व आवश्यक उपाय सक्तीने लागू करावेत. देशभरातील कोरोनाचा वाढता संसर्ग बघता रोज दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या २५ हजार एवढी निश्चित करण्यात आली आहे.

गुहेत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे. आकडेवारीनुसार मागील काही दिवसांत रोज १० ते १५ हजार भाविक पवित्र गुहेच्या दर्शनासाठी येत आहेत. अधिकृत आकडेवारी पाहिल्यास मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत २.४४ लाख जास्त भाविकांनी दर्शन घेतले आहे. यंदा १ जानेवारी ते १८ मार्च दरम्यान एकूण १२.५२ लाख भाविकांनी गर्भगृहाचे दर्शन घेतले. तर यंदा ११ एप्रिलपर्यंत हा आकडा १४.९६ लाख भाविकांपर्यंत गेला आहे.

बाहेरून येणारे कलाकार नऊ दिवस होतील भजन, अटका आरतीत सहभागी
देशभरातून येणाऱ्या वैष्णोदेवीच्या भाविकांसाठी यावेळी कटरा बेस कॅम्पमध्ये किंवा जम्मू विमानतळ आणि जम्मू रेल्वेस्थानकावर कोरोना चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जो भाविक रस्ते मार्गाने येईल त्यांची स्क्रीनिंग बाणगंगा येथे करण्यात येईल. बोर्डाने व्रत करणाऱ्यांसाठी रस्त्यात भोजन, राहणे व प्रसाधनाची सोयही केली आहे. बोर्डाने जम्मू- काश्मीर बाहेरच्या कलाकारांनाही निमंत्रित केले आहे. ते सकाळ- संध्याकाळ भजन आणि अटका आरतीत भाग घेतील. यात्रा मार्गावर सुरक्षेचे सर्व उपाय करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी लाउडस्पीकर आणि सीसीटीव्हीदेखील लावण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...