आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तुम्ही अनेक प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या असतील, LoC पलिकडच्या फिल्मी लव्ह स्टोरीज पाहिल्या असतील. पण, आज आम्ही ज्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत, त्यात ‘गदर’ किंवा ‘वीर जारा’ सारखा संघर्ष नसला, तरी अनेक अडचणी आहेत.
भोपाळचा रहिवासी असलेल्या 29 वर्षीय तारिक आणि कराची (पाकिस्तान) च्या 27 वर्षीय हीराने लग्न करण्याचा विचार केला. पण, त्यादरम्यान पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला. यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केली. यादरम्यान, घाई-घाईत त्यांचे लग्न झाले, पण विदाईचे विधी होऊ शकले नाही. लग्नानंतरच्या विधींच्या तारखा ठरतील, त्याआधीच भारतात CAA-NRC विरोधात तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली. नंतर कोरोनामुळे देशात मोठा लॉकडाउन लागला. पण, आता अखेर तारीक आणि हीराच्या लव्ह स्टोरीत रंग भरले आहेत. अनेक अडचणी आणि लग्नाच्या 23 महिन्यानंतर 2 फेब्रुवारी 2021 ला दोघांच्या लग्नाचे विधी पूर्ण झाले. जाणून घ्या या प्रेम कहाणीबद्दल विस्ताराने...
आईने पहिल्याच भेटीत विचारले - तू माझी सून होशील का ?
कराचीमध्ये राहणाऱ्या हीराचे आजोळ भोपाळमध्ये आहे आणि ती नेहमी आपल्या आजीला भेटायला यायची. 2013 मध्ये ही लव्ह स्टोरी तेव्हा सुरू झाली, जेव्हा भोपाळच्या बिट्टन मार्केटमधील एका हुक्का लाउंजमध्ये एका कॉमन फ्रेंडने तारिक आणि हीराची भेट करुन दिली. या भेटीनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. 2015 मध्ये हीरा लाँग टर्म व्हीसावर 2 वर्षांसाठी भारतात आली. यादरम्यान तारिक आणि हीरा अनेकदा भेटले. तारिक सांगतो की, '2017 मध्ये जेव्हा हीरा परत पाकिस्तानला जाण्यासाठी निघाली, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रु आले. तेव्हा ती म्हणाली, एकदा आपल्या आईची भेट घालून दे.' जेव्हा हीरा आणि आई एकमेकींना भेटले, तेव्हा मीठी मारून रडू लागल्या. काही वेळानंतर आईने हीराला थेट विचारले, तु माझू सून होशील का ?'
पुलवामा अटॅक, सर्जिकल स्ट्राइक, एनआरसी प्रोटेस्ट आणि लॉकडाउनमुळे वाढल्या अडचणी
तारिक पुढे सांगतो की, ‘2018 मध्ये परत भारतात आली, तोपर्यंत आमचे रिलेशनशीप सुरू झाले होते. 2019 च्या सुरुवातीला दोन्ही कुटुबांमध्ये आमच्या लग्नाची बोलणी सुरू झाली होती. यादरम्यान 14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामुळे भारत-पाकिस्तानात तणाव वाढला. यानंतर 26 फेब्रुवारी 2019 ला भारताने पाकिस्तानावर एअर स्ट्राइक केली. दोन्ही देशांमधील संबंध इतके बिघडले की, हीराला परत पाकिस्तानात पाठवण्याच्या चर्चा सुरू झाल्या. यादरम्यान आमच्या कुटुंबाने आमचे लग्न करण्याचे ठरवले, म्हणजे पेपर वर्क झाल्यानंतर हीराला भारतात राहता येईल.’
यादरम्यान घाई-घाईत 2 मार्च 2019 ला फक्त 24 तासात सर्व तयारी करुन भोपाळमध्ये आमचे लग्न झाले. लग्नानंतरच्या विधी न झाल्यामुळे हीरा तारिकच्या घरी जाण्याऐवजी आपल्या आजीच्या घरी राहू लागली. त्या वेळेस दोन्ही कुटुंबांनी ठरवले की, वातावरण ठीक झाल्यानंतर विधी करुन हीराला तारिकच्या घरी पाठवले जाईल. पण, मध्येच CAA-NRC विरोधात आंदोलन सुरू झाले. यानंतर कुटुंबाने परत सर्व विधी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
तारिक पुढे सांगतो की, लग्नानंतर आम्हाला आमचे लग्न सेलिब्रेट करायचे होते, पण मध्येच कोरोना महामारी आली आणि सर्वत्र लॉकडाऊन लागला. हीरा सांगते की, 'तारिक आणि माझे लग्न झाले होते, पण यात मित्र आणि नातेवाइकांना येता आले नाही. अनेक अडचणींमुळे आम्ही सोबत राहू शकत नव्हतो.
तारिक सांगतो की, 'जूननंतर लिमिटेड गेस्टसोबत कार्यक्रम करण्याची परवानगी मिळाली. पण आम्ही विचार केला की, इतके दिवस वाट पाहिली, अजून काही दिवस पाह आणि अखेर 2 फेब्रुवारी 2021 ला सर्व विधी करुन घेतल्या. आता हीरा लवकरच भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.