आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेमी युगुलांसाठी फेब्रुवारी महिना तसा खासच म्हणावा लागेल. कित्येक जण या महिन्याची चातकासारखी वाट पाहत असतात; कारण या महिन्याच्या ऐन गुलाबी थंडीत 'व्हेलेंन्टाईन डे' येतो. "प्रेमाचा असा कोणताही ठरलेला दिवस नसतो" असे म्हणणाऱ्यांना देखील हा 'व्हेलेंन्टाईन' न कळत ओढ लावतोच.
हल्लीच्या जमान्यात मेसेजेस, गिफ्टचा पाऊस, सरप्राईज त्यामुळे 'व्हेलेंन्टाईन डे' साजरा करणं तसं सोप्प झालं. पण ऐकीकाळी प्रेमाचा इजहार करण्यासाठी थरथरत्या हाताने, थरथरतं काळीज कागदावर उतरवलं जायचं. होकार येणार की नकार; असे विचार करत काळीज धडधड करायचं. प्रेमाची ही परीक्षा जगभरातील सर्वात अवघड परीक्षापैकी एक असते. या महिन्याला प्रेमी युगुल 'प्रेम मासिक' असे देखील संबोधतात. कारण याच महिन्यात कुणाचे प्रेमप्रकरण जुडते तर कुणाचे कायमचेच टुटते.
फेब्रुवारीच्या सात तारखेपासून, प्रेमाच्या खऱ्या परीक्षेला सुरुवात होत असते. प्रेमी युगुलासाठी एक आठवडा या परीक्षेचे जगभरात आयोजन करण्यात येते; मात्र त्यासाठी प्रेमाच्या परीक्षेत पास होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण एकदाकी प्रेमाच्या परीक्षेत पास झालात की मग बससस... या परीक्षेत काही नवीन खिलाडी असतात, तर काही जुने. नवीन खिलाडी ही परीक्षा देऊन नवीन नाते जोडण्याचे प्रयत्न करत असतात.
तर जुने खिलाडी दरवर्षी परीक्षेत बसून, जास्तीत जास्त अंक मिळवण्याचे प्रयत्न करतात. जर तुम्हाला देखील ही परीक्षा द्यायची असेल तर या परीक्षेचे वेळापत्रक आता जाहीर झाले आहे. कोणता पेपर कधी आहे, जेणेकरून या प्रेम परीक्षेची तयारी व्यवस्थितरित्या होऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊया... प्रेमाच्या परीक्षेचा हा वेळापत्रक ज्यात अनेक जण देणार आहेत जगातील सर्वात अवघड परीक्षा... जाणून घेऊया...
पहिला पेपर 'रोझ डे' (7 फेब्रुवारी)
प्रेमाच्या या परीक्षेचे नाव आहे; 'व्हॅलेंटाईन डे'... याची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून सुरू होते. सर्वात आधी पहिला दिवस असतो, तो म्हणजे 'रोज डे' प्रेमाच्या या अनोख्या आठवड्याची सुरुवात गुलाबाच्या सुंदर सुगंधाने आणि त्यांच्या सौंदर्याने होते. या दिवशी प्रेमी जोडपे एकमेकांना गुलाबाचे फुल देऊन, मनातल्या भावना एकमेकांसोबत व्यक्त करतात. गुलाबचे वेगवेगळे असणारे रंग आपल्या भावना दर्शवतात. जसे की, अनेक जण 'रोझ डे'च्या दिवशी आपल्या मित्राला, क्रश आणि शत्रूंना वेगवेगळ्या रंगाचे गुलाब देत असतात. कारण गुलाबाच्या रंगाचे वेगवेगळे अर्थ देखील आहेत.
दुसरा पेपर 'प्रपोझ डे' (8 फेब्रुवारी)
'व्हेलेंन्टाईन डे' चा दुसरा दिवस असतो तो म्हणजे 'प्रपोझ डे'. या दिवशी आशिक आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीला व्यक्त करत असतो. म्हणजेच जी कुणी समोरची व्यक्ती त्याला आवडत असते, तो त्याला आपल्या मनातील भावना प्रपोझच्या माध्यमातून सांगत असतो. तर तुम्ही पुर्वीपासूनच रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुम्ही या दिवशी आपल्या पार्टनरला अनोख्या स्टाईलने 'प्रपोझ' करून आपल्या नात्यात आणखीणच गोडवा निर्माण करू शकता.
तिसरा पेपर 'चॉकलेट डे' (9 फेब्रुवारी)
कोणत्याही नात्यात प्रेम असेल तर गोडवा आपोआपच निर्माण होतो. त्यामुळे 'व्हेलेंन्टाईन डे'च्या आठवड्यात आपण गोडव्याद्वारे नात्यामध्ये आणखीणच गोडवा निर्माण करू शकता. तिसरा दिवस हा 'चॉकलेट डे'चा असतो. त्यात जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन नात्यात गोडवा आणण्यासाठीचे प्रयत्न करत असतात.
चौथा पेपर 'टेडी डे' (10 फेब्रुवारी)
आपले हृदय हे टेडीसारखे नाजूक असते, त्यामुळेच तर म्हटले जाते की, "दिल तो बच्चा है जी" त्यामुळे 'व्हेलेंन्टाईन डे' चा एक दिवस 'टेडी डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कपल एकमेकांना 'टेडी बियर' गिफ्ट करतात. मुलींना अशा प्रकारचे गिफ्ट खुपच जास्त आवडतात, त्यामुळे मुले मुलींना या दिवशी डेटी मोठ्या प्रमाणात देतात.
पाचवा पेपर 'प्रॉमिस डे' (11 फेब्रुवारी)
जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिप असतात किंवा कुणासोबत नवीन नाते जोडवण्याचे प्रयत्न करतात. तेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीला काहीतरी 'वचन' द्यावे लागते. तसे पाहिल्या गेले तर पार्टनर एकमेकांना कधी आणि केव्हाही वचन देऊ शकतात; मात्र 'व्हेलेंन्टाईन डे' च्या पाचव्या दिवशी जोडप्यांसाठी खास 'प्रॉमिस डे' असतो. यादिवशी तुम्ही आपल्या पार्टनरला नेहमीसोबत राहण्याचे, नेहमी आनंदी ठेवण्याचे किंवा अन्य काही वचन देऊ शकतात.
सहावा पेपर 'हग डे' (12 फेब्रुवारी)
'व्हेलेंन्टाईन डे' च्या सहावी दिवशी 'हग डे' असतो. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांची गळाभेट घेतात. जादूची झप्पीच्या बहाण्याने जोडपे आपल्या हृदयातील भावना एकमेकांसोबत व्यक्त करतात.
सातवा पेपर 'किस डे' (13 फेब्रुवारी)
शब्दांनी प्रेम व्यक्त करता येत नसले तरी, एका प्रेमळ चुंबनाने प्रियकर खूप काही सांगून टाकतो. 'व्हेलेंन्टाईन डे'च्या सातव्या दिवशी 'किस डे' असतो. यादिवशी जोडपे एकमेकांची प्रेमळ चुंबन घेतात.
या सात दिवसाच्या परीक्षेत मेहनत घेऊन पास झालेले प्रेमीयुगुलाचा निकाल हा 14 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येतो. आपण या प्रेमाच्या परीक्षेत पास झाल्याचा आनंद पार्टनर एकमेकांना शेअर करत 'व्हेलेंन्टाईन डे' साजरा करतात; मात्र जो या परीक्षेत नापास झाला, त्याच्यासाठी हा दिवस जरा कठीण म्हणावा लागेल. कारण आपल्यासमोर परीक्षेत पास होऊन दुसरा व्यक्ती जर आनंद साजरा करत असेल, तर दु:ख जरा जास्तीत होतो. ते म्हणतात ना, "दोस्त फेल होता है तो दु:ख होता है, और पास होता है तो और जादा दु:ख होता है"
असो, सर्वांचा 'व्हेलेंन्टाईन डे' चांगल्या प्रकारे जावो याच शुभेच्छा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.