आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगड:धर्मांतराविरुद्ध धार्मिक स्थळाची तोडफोड

नारायणपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तीसगडच्या बस्तर भागातील आदिवासीबहुल नारायणपूर गावात धर्मांतराच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला सोमवारी हिंसक वळण िमळाले. एका गटाने शहर बंद करून धार्मिक स्थळावर तोडफोड केली. या वेळी समजावण्यासाठी नारायणपूरचे पोलिस अधीक्षक सदानंद कुमार यांनी धार्मिक स्थळात प्रवेश केल्यावर जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली यात कुमार यांचे डोके फुटले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सीएएफने पोलिस अधीक्षकांना बाहेर काढले. यानंतर पोलिसांनी जमावाला पिटाळून लावले. सध्या नारायणपूरमध्ये प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

नारायणपूरमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून धर्मांतराच्या मुद्द्यावर दोन गटांमध्ये धुसफूस सुरू आहे. रविवारी काही लोकांनी एका गटावर हल्ला केला. त्याविरोधात दुसऱ्या गटाने शहरात बंद पुकारला होता. त्याच वेळी बंद समर्थकांचा एक गटाने बंगलापारा येथील धार्मिक स्थळात घुसून तोडफोड सुरू केली.

बातम्या आणखी आहेत...