आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा:वंदे भारत एक्स्प्रेसने ताशी 160 किमीचा अपेक्षित केला वेग पार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसने शनिवारी आपल्या सुरुवातीच्या यात्रेदरम्यान जास्तीत जास्त ताशी १६१ किमीचा वेग प्राप्त केला. याची वेग मर्यादा ताशी १६० किमी आहे. भोपाळ व दिल्लीदरम्यान प्रवासाचा अवधी एक तासापेक्षा कमी करणाऱ्या रेल्वेने आग्रा व मथुरेदरम्यान ताशी १६१ किमी वेगाला स्पर्श केला. आग्रा केंट व निजामुद्दीन रेल्वे स्थानकांदरम्यान रुळाचा छोटा भाग वेगानुरूप डिझाइन केले आहे.