आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vande Bharat Mission Evacuation Flight Timings Latest News Update | Air India Flight Schedule Today; Delhi Bengluru Mumbai Kochi Hyderabad Chennai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वंदे भारत मिशन:सॅन फ्रांसिस्कोवरुन 118 भारतीयांसोबत पहिली फ्लाइट हैदराबादमध्ये पोहचली, वेगवेगळ्या देशातून आणखी 6 विमान येणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो दोहाचा आहे. मिशनच्या तिसऱ्या दिवसी तेथून 175 भारतीयांना परत आणण्यात आले. - Divya Marathi
हा फोटो दोहाचा आहे. मिशनच्या तिसऱ्या दिवसी तेथून 175 भारतीयांना परत आणण्यात आले.
  • मिशनच्या पहिल्या फेजमध्ये 14 मे पर्यंत 14 हजार 800 भारतीयांना परत आणण्याची योजना आहे

कोरोना महामारीमुळे परदेशात अडकेलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू केलेल्या मिशन वंदे भारतचा आज पाचवा दिवस आहे. पहिली फ्लाइट सॅन फ्रांसिस्कोवरुन 118 भारतीयांना घेऊन आज(दि.11) सकाळी 9 वाजून 22 मिनीटांनी हैदराबादमध्ये आली. ही फ्लाइट मुंबईवरुन हैदराबादला आली. वेगवेगळ्या देशांमधून आज आणखी 6 फ्लाइट येणार आहेत. यापैकी एक फ्लाइट अबू धाबीवरुन रात्री 9.30 वाजता हैदराबादला येईल. 

आज या 6 फ्लाइट येणार

1. लंडन-दिल्ली-बंगळुरू

2. ढाका-मुंबई

3. दुबई-कोच्ची

4. अबू धाबी-हैदराबाद

5. कुआलालंपुर-चेन्नई

6. बहरीन-कोझिकोड

आखाती देशातून केरळला आलेले 5 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

केरळच्या आरोग्य मंत्री शैलजा यांनी रविवारी सांगितले की, 7 मे रोजी अबू धाबीवरुन आलेल्या 5 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. वंदे भारत मिशनअंतर्गत यापूर्वीच भारतात आलेले दोन नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. मिशन अंतर्गत आलेल्या पहिल्या विमानात 9 बालकांसोबत 363 लोक होते.

वंदे भारतचा दुसरा फेज 15 मे पासून सुरू होईल

वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात येणाऱ्या नागरिकांना फ्लाइटचा आणि क्वारेंटाइनचा खर्च द्यावा लागेल. पहिल्या फेजमध्ये 14 मे पर्यंत 12 देशातून 14 हजार 800 भारतीयांना आणण्याची योजना आहे. मिशनची दुसरी फेज 15 मे पासून सुरू होईल. या फेजमध्ये सेंट्रल एशिया आणि यूरोपीय देश, जसे कजाकिस्तान, उज्बेकिस्तान, रशिया, जर्मनी, स्पेन आणि थायलँडवरुन भारतीयांना आणले जाईल. या मिशनमध्ये वृद्ध, गर्भवती महिला, विद्यार्थी, आणि आजारी व्यक्तींना प्राथमिकता दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...