आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Varanasi 2006 Blast Case Updates । After 16 Years Today Ghaziabad Court Announces Death Sentance To Terrorist Valiullah

वाराणसी बॉम्बस्फोट खटल्यात 16 वर्षांनी निकाल:दहशतवादी वलीउल्लाहला गाझियाबाद कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

गाझियाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसीत 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी वलिउल्लाहला गाझियाबाद न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयाने दुपारी 3.30 वाजता हा निकाल दिला. हा निर्णय तब्बल 16 वर्षांनंतर आला आहे. वलीउल्ला हा आतापर्यंत कायदेशीर गुंतागुंतीमुळे शिक्षेपासून वाचत आला होता.

हे छायाचित्र 7 मार्च 2006 रोजी दशाश्वमेध घाटावर झालेल्या स्फोटाचे आहे. त्यादिवशी संकट मोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानकावरही स्फोट झाले. (फाइल फोटो)
हे छायाचित्र 7 मार्च 2006 रोजी दशाश्वमेध घाटावर झालेल्या स्फोटाचे आहे. त्यादिवशी संकट मोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानकावरही स्फोट झाले. (फाइल फोटो)

प्रयागराज जिल्ह्यातील रहिवासी आहे वलीउल्लाह

डीजीसी क्रिमिनल राजेश चंद्र शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, 7 मार्च 2006 रोजी वाराणसीमधील संकट मोचन मंदिर, कँट रेल्वे स्टेशन आणि दशाश्वमेध घाट येथे बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 76 जण जखमी झाले आहेत.

5 एप्रिल 2006 रोजी पोलिसांनी प्रयागराज जिल्ह्यातील फुलपूर गावातील रहिवासी असलेल्या वलीउल्लाहला अटक केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची सुनावणी वाराणसीहून गाझियाबाद न्यायालयात ट्रान्सफर झाली होती.

7 मार्च 2006 रोजी वाराणसी येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी वलीउल्लाह याचे हे छायाचित्र आहे. 5 एप्रिल 2006 रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती.
7 मार्च 2006 रोजी वाराणसी येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी वलीउल्लाह याचे हे छायाचित्र आहे. 5 एप्रिल 2006 रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

संकटमोचन आणि दशाश्वमेध घाट स्फोटात 4 जूनला दोषी जाहीर

4 जून रोजी गाझियाबादचे जिल्हा न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या कोर्टाने वलीउल्लाहला दशाश्वमेध घाट आणि संकट मोचन मंदिरात बॉम्बस्फोट, खून, खुनाचा प्रयत्न, कायद्याविरुद्ध कृती, दहशत पसरवणे आणि स्फोटक पदार्थ वापरणे याप्रकरणी दोषी ठरवले होते. तर कँट रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटातील पुराव्याच्या आधारे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

हे छायाचित्र 4 जून रोजीचे गाझियाबादचे आहे. वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरणी वलीउल्लाहला जिल्हा न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
हे छायाचित्र 4 जून रोजीचे गाझियाबादचे आहे. वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरणी वलीउल्लाहला जिल्हा न्यायाधीश जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

16 वर्षांत पकडू शकले नाहीत स्फोटाचे 3 आरोपी

वलीउल्लाहच्या चौकशीत त्याचे साथीदार मुस्तकीम, झकेरिया आणि शमीम यांचीही नावे समोर आली होती. हे सर्वजण उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. बॉम्बस्फोटाला 16 वर्षे झाली तरी हे आरोपी पकडले गेलेले नाहीत. सुरक्षा यंत्रणांच्या मुसक्या आवळल्यानंतर हे आरोपी बांगलादेशमार्गे पाकिस्तानात पळून गेले आणि परतलेच नाहीत. या स्फोटांना 16 वर्षे उलटूनही तिन्ही आरोपी पकडले जात नसल्याने देशातील सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...