आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसीत भीषण अपघात:काळाने घातला घाला, दिवाळीसाठी घरी जात असलेला मजुरांनी भरलेला पिकअप पलटी, 4 महिलांचा जागीच मृत्यू तर 19 जण गंभीर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीला घरी जात असतांना रस्त्यांतच भीषण अपघात झाल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या वाराणसीच्या डाफी या भागात घडली आहे. नॅशनल हायवेवर जात असतांना अचानक पिकअप पलटी झाल्याने ही घटना घडली आहे.

या घटनेत पिकअपमधील चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकमध्ये असलेले हे सर्वजण मोलमजूरीचे काम करत असून, ते दिवाळीसाठी बरेलीहून बिहारच्या दाउद नगर (औरंगाबाद) येथे जात होते.

या पिकअपमध्ये एकूण नऊ कुटूंबाचे 25 जण प्रवास करत होते. हे सर्वजण पोटाची आग विझवण्यासाठी हे सर्वजण बिहारवरून बरेलीला मोलमजूरी करण्यासाठी आले होते. हे सर्व जण दिवाळीसाठी आपल्या गावी भाड्याच्या पिकअपमध्ये जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, पिकअपचा ड्राइवर हा झोपेत असल्याने पिकअप डिव्हाडरवर धडकल्याने पिकअप पलटी झाला होता.

त्यानंतर मोठ्या प्रमाणात आरडाओरड सुरू झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पिकअपमध्ये अडकलेल्या मजुरांना काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर या सर्व मजूरांना रुग्णालयात दाखल केला असता, त्यातील चार महिलांचा मृत्यू झाला. तर 19 जण गंभीर असून, त्यातील चार जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याची माहिती मिळत आहे. गंभीर रुग्णामध्ये काही लहान मुलांचे देखील समावेश आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढू शकतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...