आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे:वाराणसीत नारेबाजीच्या सावटात पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण संपले, मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी नोंदवला आक्षेप

वाराणसी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसीतील किरकोळ तणाव व नारेबाजीच्या सावटात श्रीकाशी विश्वनाथ धाम-ज्ञानवापी मशिदीतील पहिल्या दिवसाचे व्हिडिओग्राफी व सर्वेक्षणाचे काम संपले. आता हे काम शनिवारी पुन्हा सुरू होईल. पण, अंजुमन इंतजामिया मसाजिद कमेटीचे वकील अभय नाथ यादव यांनी या प्रकरणी अ‍ॅडव्होकेट आयुक्तांवर गंभीर आरोप केलेत.

'ज्ञानवापी परिसरात पश्चिम बाजूला असणाऱ्या चबुतऱ्याची व्हिडिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर 5.45 वा. अॅडव्होकेट आयुक्तांनी ज्ञानवापी मशिदीचे प्रवेशद्वार उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला असता आम्ही त्याला विरोध दर्शवला. न्यायालयाच्या आदेशात बॅरिकेड्सच्या आत जाऊन व्हिडिओग्राफी करण्याचे नमूद नाही,' असे ते म्हणाले. याऊलट आयुक्तांनी आपल्याला असे आदेश असल्याचा दावा केला आहे.

'मशिदीच्या भीतींवर नखाने ओरखडे मारले जात होते. न्यायालयाच्या आदेशात असे करण्यास मनाई आहे. त्यामुळे आम्ही अॅडव्होकेट आयुक्तांवर नाराज आहोत. उद्या याप्रकरणी न्यायालयाला दुसरा एखादा आयुक्त नेमण्याची मागणी केली जाईल,' असे यादव म्हणाले.

वाराणसीतील श्रीकाशी विश्वनाथ धाम-ज्ञानवापीच्या व्हिडिओग्राफी व सर्व्हेक्षणाचे काम अ‍ॅडव्होकेट आयुक्त अनिल कुमार मिश्रा यांच्या नेतृत्वात सुरू झाले आहे. यासाठी मिश्रांसह फिर्यादी पक्षाच्या 18 जणांचे एक पथक ज्ञानवापीला पोहोचले आहे. हे पथक पाहताच काही तरुणांनी 'हर-हर महादेव'ची गर्जना केली. तर त्यानंतर काही मुस्लिम तरुणांनीही प्रत्युत्तरादाखल 'अल्लाह हू अकबर'चे नारे दिले. सध्या याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सर्व्हे केला जात आहे.

याचिकाकर्त्या 5 महिलांचे वकील दिल्लीचे शिवम गौड यांनी हे सर्व्हेक्षण 3 दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ते म्हणाले -'कोर्टाच्या आदेशानुसार संपूर्ण परिसराचा सर्व्हे केला जाईल. यात संपूर्ण ज्ञानवापी मशिद परिसर व श्रृंगार गौरीचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्या सर्व्हेसाठी किमान 3 दिवसांचा अवधी लागेल. हे काम रविवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे.'

काशी विश्वनाथ मंदिराचे विश्वस्त बृजभूषण ओझा यांनी नारेबाजी करणाऱ्यांवर तिखट शब्दांत टीका केली. ते म्हणाले -'नारेबाजी करणारे लोक न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करत आहेत. त्यांनी ते भारतीय आहेत की अन्य कोणत्या देशाचे हे सिद्ध करावे.'

'अयोध्येच्या तपस्वी छावणीचे जगद्गुरु परमहंसाचार्य म्हणाले की, व्हिडिओग्राफी व सर्व्हेचे काम सुरू झाले आहे. पण, काही मुस्लिम विरोध करत आहेत. त्यामुळे विरोध करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल.'

पोलिसांनी नारेबाजीनंतर मुस्लिम समुदायाच्या नागरिकांची समजूत काढली.
पोलिसांनी नारेबाजीनंतर मुस्लिम समुदायाच्या नागरिकांची समजूत काढली.

शुक्रवारच्या नमाजानंतर नारेबाजी

वाराणसीच्या श्रीकाशी विश्वनाथ धाम-ज्ञानवापी स्थित श्रृगांर गौरी व अन्य देवतांची व्हिडिओग्राफी व सर्व्हेक्षणापूर्वीच गोंधळ सुरू झाला आहे. शुक्रवारच्या नमाजाठी अन्य दिवसांच्या तुलनेत जास्त संख्येने लोक पोहोचले होते. नमाजानंतर काही असामाजिक तत्वांनी धार्मिक नारेबाजी करुन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना पळवून लावले. ज्ञानवापीच्या आसपास सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे परिसरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यात आली आहेत.

शुक्रवारच्या नमाजानंतर तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी स्थानिकांची समजूत काढली.
शुक्रवारच्या नमाजानंतर तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी स्थानिकांची समजूत काढली.

10 मे रोजी न्यायालयात सादर होणार अहवाल

वाराणसी कोर्टाच्या आदेशांनुसार श्रीकाशी विश्वनाथ धाम-ज्ञानवापी स्थित श्रृंगार गौरी व अन्य देवतांची व्हिडिओग्राफी व सर्व्हेचे काम केले जात आहे. या प्रकरणातील सर्वच साक्षी पुरावे पोलिस आयुक्त सुरक्षित ठिकाणी ठेवतील.

सर्व्हेचा अहवाल 10 मे रोजी न्यायालयात सादर केला जाईल. या प्रकरणी वाराणशी आयुक्तालय व वाराणसी ग्रामीणच्या सर्वच पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुप्तहेर विभागाला अतिरिक्त खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आलेत.

ज्ञानवापीच्या परिसरातील दुकाने बंद झाली आहेत. लोक दुकानांतून बाहेरचा कानोसा घेत आहेत.
ज्ञानवापीच्या परिसरातील दुकाने बंद झाली आहेत. लोक दुकानांतून बाहेरचा कानोसा घेत आहेत.

काशी विश्वनाथ मंदिराबाहेर महिलेचा नमाज

ज्ञानवापी परिसरातील व्हिडिओग्राफी प्रकरणी शुक्रवारी सकाळपासूनच सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. हा संपूर्ण परिसर होर्डिंग्जने झाकण्यात आला आहे. मशिदीत कुणालाही प्रवेश न देण्याची वल्गना करणाऱ्या अंजुमन इंतजामिया मसाजिद कमिटीच्या जॉइंट सेक्रेटरी एम.एस. यासीन यांनी या प्रकरणी माध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला आहे. त्यांनी यासाठी आपल्या प्रकृतीचे कारण दिले आहे. दुसरीकडे, दुपारी एका महिलेने विश्वनाथ मंदिराच्या गेट क्रमांक 4 बाहेर नमाज अदा केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. या महिलेला सध्या ताब्यात घेण्यात आले आहे.

एक महिला रस्त्यावर बसून नमाज अदा करत होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
एक महिला रस्त्यावर बसून नमाज अदा करत होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

चौकशीत सदर महिलेने सांगितले की, तिच्या पतीचे पहिल्या पत्नीपासून 7 मुले आहेत. पतीने तिला घरातून बाहेर काढले आहे. ती वेडसर असून, तिने फरीद बाबांनी स्वप्नात दिलेल्या माहितीनुसार मंदिरापुढे नमाज अदा केल्याचे म्हटले आहे. महिलेला उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्ञानवापी मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी उसळलेली गर्दी.
ज्ञानवापी मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी उसळलेली गर्दी.

ऑगस्ट 2021 मध्ये दाखल झाला होता खटला

दिल्लीच्या राखी सिंह, लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास व रेखा पाठक यांनी विश्व वैदिक सनातन संघाचे जितेंद्र सिंह विसेन यांच्या नेतृत्वात 18 ऑगस्ट 2021 रोजी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला होता. राखी सिंह विरुद्ध सरकार उत्तर प्रदेश नामक या खटल्याद्वारे श्रृंगार गौरीच्या नियमित दर्शन व पूजनाची तथा अन्य देवतांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली होती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अजयकुमार मिश्रा यांची अॅडव्होकेट आयुक्तपदी नियुक्ती करुन ज्ञानवापी परिसराचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मिश्रा यांनी 6 मे रोजी दुपारी 3 वा. सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

ज्ञानवापीच्या व्हिडिओग्रापी व सर्व्हेसाठी पोहोचलेले अॅडव्होकेट कमिश्नर व फिर्यादी.
ज्ञानवापीच्या व्हिडिओग्रापी व सर्व्हेसाठी पोहोचलेले अॅडव्होकेट कमिश्नर व फिर्यादी.
ज्ञानवापीच्या आसपास पोलिस व पीएसीचा तगडा बंदोस्त तैनात करण्यात आला आहे.
ज्ञानवापीच्या आसपास पोलिस व पीएसीचा तगडा बंदोस्त तैनात करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...