आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Varun Gandhi | Trinmul Congress | Bjp | Will Varun Gandhi Join BJP Soon ?, Mamata Banerjee Likely To Join Trinamool Congress; An Important Meeting Will Be Held In Delhi Today

भाजपवर नाराजी:वरुण गांधी लवकरच भाजपला रामराम करणार?, ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता; आज होणार दिल्लीत महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षनेतृत्वावर नाराज असलेले खासदार वरुण गांधी आता भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वरुण गांधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे देखील बोलले जात आहे. ममता बॅनर्जी आजपासून दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आणि वरुण गांधी यांची भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमध्ये वरुण गांधी तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून वरुण गांधी भाजपवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा जाहीरपणे भाजपवर टीकाही केली आहे.

काही दिवसांपासून वरुण यांनी पक्षावरील आपली जाहीर नाराजी अनेकदा व्यक्त केली आहे. अनेकदा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि मोदींवर देखील टीकास्त्र केले. तसेच केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे देखील ते विरोध करत होते. अनेक दिवसांपासून भाजपसोबत नाराजी असल्याने ते भाजपला रामराम ठोकूण तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपासून खासदार वरुण गांधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत. आजपासून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, वरुण गांधी त्यांची भेट घेणार असून, त्यात तृणमूलमधील प्रवेशाबाबतची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्यात आले आहे. तेव्हापासून वरुण गांधींनी भाजप पक्षावर नाराजी व्यक्त केली होती.

मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर हल्लाबोल करत, आंदोलनादरम्यान मृत्यु पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ एक कोटींची मदत करा अशी मागणी त्यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...