आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ पत्रकार डॉ. वेद प्रताप वैदिक यांचे मंगळवारी वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंदूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वैदिक हे सकाळी बाथरूममध्ये घसरून पडले होते. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असे सांगण्यात येत आहे. डॉ. वैदिक यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
डॉ. वैदिक यांनी 1958 मध्ये पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. पीएचडी संशोधनादरम्यान, त्यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठ, मॉस्कोमधील‘इंस्तीतूते नरोदोव आजी’, लंडनमधील स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज आणि अफगाणिस्तानमधील काबूल विद्यापीठातून अभ्यास आणि संशोधन केले.
डॉ. वैदिक यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)च्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून आंतरराष्ट्रीय राजकारणात पीएचडी प्राप्त केली. आंतरराष्ट्रीय राजकारणावर हिंदीत शोधनिबंध लिहिणारे ते भारतातील पहिले विद्वान आहेत. या कारणामुळे त्यांना जेएनयूमधून बाहेर काढण्यात आले होते. 1965-67 मध्ये हे प्रकरण इतके गाजले की संसदेत त्याची चर्चा झाली होती.
वैदिक यांनी वयाच्या 13व्या वर्षी पहिली तुरुंगवारी केल्याचे सांगितले जाते. हिंदी सत्याग्रही म्हणून ते 1957 मध्ये पतियाळा तुरुंगात राहिले. त्यांना विश्व हिंदी सन्मान (2003), महात्मा गांधी सन्मान (2008) यांसह अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले.
वेदप्रताप वैदिक यांची गणना अशा लेखक आणि पत्रकारांमध्ये केली जाते ज्यांनी हिंदी ही मूलभूत विचारांची भाषा केली. डॉ. वैदिक यांचा जन्म 30 डिसेंबर 1944 रोजी इंदूर येथे झाला. त्यांना रशियन, पर्शियन, जर्मन आणि संस्कृत भाषांचेही ज्ञान होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.