आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Veer Chakra | Abhinandan |Wing Commander Abhinandan, Who Shot Down Pakistan's F 16 Fighter Jet, Honored With 'Veer Chakra' Award By President Ramnath Kovind

देशाच्या वीरांचा सन्मान:पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडणारे, विंग कमांडर अभिनंदन यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'वीरचक्र' पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीर चक्र’ पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्धमान यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनामध्ये पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला. त्यात जीवाची काळजी न घेतला बाजी लावणाऱ्या जवानांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही उपस्थिती दर्शवली होती. याआधी हवाई दलाने अभिनंदन वर्धमान यांना विंग कमांडरवरून ग्रुप कॅप्टन अशी बढती दिली आहे.

अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाचा वेध घेत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचा वीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. वीर चक्र हा तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे असून, शत्रूला धूळ चारण्यात दाखवलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.

27 फेब्रुवारी 2019 ला मिग-21 बायसेन या विमानातून पाकिस्तानच्या F-16 विमानांचा पाठलाग करून, अभिनंदन यांनी एक विमान पाडले होते. त्यानंतर एका मिसाईलनने त्यांच्या विमानाला लक्ष्य केले होते. विमान कोसळण्याआधी अभिनंदन बाहेर पडले आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अडकले आणि पाकिस्तान जवानांच्या हाती लागले. पाकिस्तानने त्यांना काही दिवस कैद केले होते. परंतु भारताच्या प्रयत्नामुळे पाकिस्तानला अभिनंदन यांना भारतात परत सोडावे लागले.

बातम्या आणखी आहेत...