आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vehicle Blast In Shopian, 3 Army Personnel Injured, Security Forces Continue Investigation

जम्मू-काश्मीर पुन्हा हादरले:शोपियानमध्ये वाहनात स्फोट, लष्कराचे 3 जवान जखमी, सुरक्षा दलाकडून तपास सुरू

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये एका वाहनात स्फोट झाला. या स्फोटात 3 जवान जखमी झाले आहेत. IGP काश्मीर यांनी सांगितले की, सेडो येथे एका खासगी भाड्याच्या वाहनात हा स्फोट झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहनात बॉम्ब लावण्यात आला होता की, बॅटरीतील बिघाडामुळे हा स्फोट झाला होता, याचा तपास करण्यात येत आहे.

मे सर्वात हिंसक महिना, 7 नागरिकांची हत्या; 5 महिन्यांत 134 लोकांचे प्राण गेले

या वर्षातील सुरुवातीच्या पाच महिन्यांत मे महिना जम्मू-काश्मीरसाठी सर्वात हिंसक ठरला. या दरम्यान 10 नागरिकांचे प्राण गेले. दुसरीकडे, खोऱ्यात झालेल्या 17 चकमकींत 27 अतिरेकी मारले गेले. सर्वाधिक फटका दक्षिण काश्मीरला बसला. तेथे 10 चकमकी झाल्या. उत्तर काश्मिरात 6 आणि मध्य काश्मीरमध्ये एक चकमक झाली.

दहशतवाद्यांकडून गेल्या 31 दिवसांत दोन महिलांसह 7 नागरिकांना ठार करण्यात आले. यात 3 हिंदू आणि 4 मुस्लिम होते. चकमकीत अडकून तीन नागरिकांनी जीव गमावला. एप्रिलमध्ये 33, मार्चमध्ये 24, फेब्रुवारीत 14 आणि जानेवारीत 24 नागरिकांचे प्राण गेले. या 5 महिन्यांत 134 लोकांचे प्राण गेले. त्यात 97 अतिरेकी, 18 सुरक्षा रक्षक आणि 19 नागरिक आहेत. सर्वाधिक हत्या काश्मिरात झाल्या.

या वर्षी 97 अतिरेकी ठार

या वर्षी आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 97 अतिरेकी मारले गेले. यामध्ये 5 जम्मू विभाग आणि 92 काश्मीर विभागात मारले गेले. आतापर्यंत ज्या अतिरेक्यांची ओळख पटली आहे, त्यात 26 बाहेरचे आणि 65 स्थानिक होते. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित 53 होते. 24 जैश, 11 हिज्बुल आणि दोन अल-बद्र संघटनेशी संघटनेशी संबंधित होते.

बातम्या आणखी आहेत...