आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शनिवारी पहाटे एका पार्किंगमध्ये आग लागल्याने ७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ४ जिवंत जळाले आणि तिघांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. ५ गंभीर जखमी झाले. माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून ही आग लावल्याचे सांगण्यात येते. त्याच्या या कृतीमुळे संपूर्ण इमारतीला आग लागली.
इंदूर पोलिस आयुक्त हरिनारायणचारी मिश्र यांनी सांगितले की, १५८ स्वर्णबाग कॉलनीत १६०० चौरस फुटांवरील १० सदनिकांच्या इमारतीत ही घटना घडली. येथे राहणाऱ्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या माथेफिरूने तिच्या गाडीला आग लावली. ही आग पार्किंगमधील १० गाड्यांपर्यंत पोहोचली. आगीने एवढे रौद्र रूप धारण केले की संपूर्ण इमारतच ज्वाळांनी वेढली गेली. स्थानिक रहिवासी, पोलिस, अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. १६ पैकी १२ जणांना वाचवण्यात यश मिळाले. पोलिसांनी इमारतीत प्रवेश केल्यानंतर ४ जणांचे मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या पॅसेज व खोल्यांत सापडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.