आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Venkaiah Naidu Personal Verified Twitter Account | Twitter Removes Blue Badge From Vice President, Vice President Venkaiah Naidu, Twitter Account, Twitter India; News And Live Updates

सरकारचे ट्विटरला अल्टीमेटम:नवीन नियम लागू न केल्याने सरकार नाराज, म्हणाले - ही शेवटची संधी नाहीतर कारवाईसाठी तुम्ही स्वत: जबाबदार असाल

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संबंधित प्रकरणात आयटी मंत्रालय ट्विटरला नोटीस बजावणार आहे.

केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये आयटी नियमांवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ट्विटरला अल्टीमेटम देत नोटीस जारी केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय टविटरकडून 28 मे आणि 2 जूनला मिळलेल्या उत्तरावर निराश आहे. कारण ट्विटरकडून याबाबत कोणतेच स्पष्टीकरण देण्यात आले नसून नवीन आयटी नियम लागू करण्यात आलेले नाही. सरकारने ट्विटरला अल्टीमेटम देत ही शेवटची संधी दिली आहे. जर ट्विटरने यावर कोणतेही पाऊल उचलले नाहीतर त्यांना मिळणारी सवलत रद्द केली जाणार आहे व यासाठी स्वत: ट्विटर जबाबदार असणार असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

ट्विटरकडे सरकारच्या तीन महत्वाच्या तक्रारी
1. ट्विटरने अद्याप मुख्य अनुपालन अधिकाऱ्यांविषयी (चीफ कंप्लायंस ऑफिसर) माहिती दिली नाही.

2. त्यासोबच नियुक्त करण्यात आलेली नोडल संपर्क व्यक्ती भारतातील ट्विटरचा कर्मचारी नाही.

3. तसेच ज्या कार्यालयाचा उल्लेख केला आहे तो कायद्याच्या फर्मचा आहे.

उपराष्ट्रपतींच्या हँडलवरून हटवले होते 'ब्लू' टिक, थोड्याच वेळात केले रीस्टोर;

ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती व्यंकया नायडूचे वैयक्तिक ट्विटर हँडल अनव्हेरिफाइड केले असून यावरील निळे टिक हटवले होते. त्यासोबतच संघातील मोठ्या नेत्यांच्या खातेदेखील अनव्हेरिफाईड केले आहे. परंतु, वाढता वाद लक्षात घेता ट्विटरने नायडू यांचे खाते पुर्ववत केले आहे.

विशेष म्हणजे उपराष्ट्रपती कार्यालयाच्या अधिकृत खात्यावरुन हे टिक असेच होते. वृतसंस्थेच्या माहितीनुसार, नायडू यांचे खाते गेल्या 11 महिन्यांपासून सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांचे खाते अनव्हेरिफाईड केले असल्याचे सांगितले जात आहे.

आयटी मंत्रालय ट्विटरला बजावणार नोटीस
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात आयटी मंत्रालय ट्विटरला नोटीस बजावणार आहे. ज्यामध्ये पुर्वसुचना न देता उपराष्ट्रपती यांचे खाते कसे अनव्हेरिफाइड केले याबाबत विचारणा करणार आहे. हा भारताच्या घटनात्मक पदाचा अवमान असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.

संबंधित प्रकरणावर ट्विटरने स्पष्टीकरण देताना म्हटले की, हे खाते जुलै 2020 पासून सक्रिय नव्हते. त्यामुळे आमच्या व्हेरिफिकेशन धोरणानुसार अशा खात्यांना कोणतीही पुर्वसुचना न देता हटवता येत असल्याचे म्हटले आहे. परंतु, सध्या उपराष्ट्रपती नायडू यांचे खाते पुर्ववत करण्यात आले आहे.

संघाच्या अनेक नेत्यांचे खाते अनव्हेरिफाईड केले
ट्विटरने उपराष्ट्रपतीसह राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील अनेक मोठ्या नेत्यांचे वैयक्तिक खात्यावरुन 'ब्लू' टिक हटवले आहे. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवतसह अरुण कुमार, भैयाजी जोशी आणि सुरेश सोनीसारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप मुंबईचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून हे भारताच्या संविधानावर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

मागील 11 महिन्यांपासून कोणतेही ट्विट नाहीत
उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या वैयक्तिक खात्याला 1.3 लाख लोक फॉलो करतात. त्यांच्या या खात्यावर गेल्या 11 महिन्यांपासून कोणतेही ट्विट नाही. या खात्यावरील शेवटचे ट्विट 23 जुलै 2020 रोजी होते.

ट्विटरवर मंत्रालय नाराज
ट्विटरच्या या एकतर्फी कारवाईवर भारताचे आयटी मंत्रालय संतप्त झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील दुसऱ्या नंबरच्या व्यक्तीशी अशाप्रकारे वागणे चुकीचे असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. ट्विटरचा या संदर्भातील युक्तिवाद देखील पूर्णपणे चुकीचा आहे.

बातम्या आणखी आहेत...