आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Venkaiah Naidu Twitter Controversy | All You Need To Know About The Blue Tick Controversy | How You Can Apply For Blue Tick For Your Twitter Account; News And Live Updates

एक्सप्लेनर:ट्विटरने उपराष्ट्रपतींचे 'ब्लू टिक' आधी काढले मग पुन्हा लावले; ट्विटरच्या कारवाईवर शंका का घेतली जात आहे? चाललयं तरी काय?

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वीलेखक: रवींद्र भजनी
 • कॉपी लिंक

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियासाठी नवीन नियमावली तयार केली होती. यासाठी फेब्रुवारी महिन्यात एक विधेयक लोकसभेत पास करण्यात आले होते. यावरुन केंद्र सरकार आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या आमनेसामने आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर ट्विटरने शनिवारी 5 जून रोजी उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांचे वैयक्तिक ट्विटर हँडलवरुन ब्लू टिक हटवले होते. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवतसह संघाच्या अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. परंतु, वाढता वाद लक्षात घेता ट्विटरने दोन तासानंतर उपराष्ट्रपती नायडू यांचे खाते पूर्ववत केले आहे. त्यामुळे ट्विटरवर या कृत्याबद्दल टीका का होत आहे? यावर ट्विटरचे स्पष्टीकरण काय आहे? चला तर मग समजून घेऊया…

ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या खात्यावरील ब्लू टिक का हटवले?

 • ट्विटरने म्हटले आहे की, उपराष्ट्रपती नायडू यांचे खाते जुलै 2020 पासून निष्क्रिय होते. त्यामुळे कंपनीच्या नवीन व्हेरिफिकेशन धोरणांतर्गत खात्यावरील ब्लू टिक आपोआपच हटवले गेले. परंतु, जेंव्हा हा वाद कंपनीच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला तेंव्हा त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करत ब्लू टिक परत केले.
 • ट्विटरने दोन आठवड्यांपूर्वी आपल्या ब्लू टिक पॉलिसीला तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा सक्रिय केले. त्यासोबतच काही नवीन मार्गदर्शक सुचनादेखील जारी करण्यात आल्या आहे. अशावेळी ते खाते गेल्या 6 महिन्यांपासून सक्रिय असायले हवे. त्यासोबचत त्या खात्यावर ट्विटरच्या नियमांचे पालनदेखील झालेले दिसायला पाहिजे.
 • ट्विटरच्या ब्लू टिक धोरणानुसार, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या वैयक्तिक खात्याला 1.3 लाख लोक फॉलो करतात. त्यांच्या या खात्यावर गेल्या 11 महिन्यांपासून कोणतेही ट्विट नाही. या खात्यावरील शेवटचे ट्विट 23 जुलै 2020 रोजी होते. त्यामुळे हे टिक आपोआपच निघाले असेल.
 • ट्विटरच्या नियमांनुसार, जर आपले खाते निष्क्रिय किंवा अपूर्ण असेल किंवा ज्या स्थानासाठी हँडल व्हेरिफाईड केले गेले होते ते जर आता नसेल तर कोणतीही पुर्वसुचना न देता ब्लू टिक आपोआपच हटवले जाईल.

ट्विटरच्या कारवाईवर शंका का घेतली जात आहे?

 • भारत सरकारने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. ट्विटरने अद्याप हे धोरण लागू केलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर इंडियाच्या दिल्ली आणि गुरुग्राम कार्यालयांवर कथित टूलकिट प्रकरणात छापेमारी केली होती.
 • ट्विटरच्या या एकतर्फी कारवाईवर भारताचे आयटी मंत्रालय नाराज आहे. देशातील दुसऱ्या नंबरच्या व्यक्तीशी अशाप्रकारे वागणे चुकीचे असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. ट्विटरचा या संदर्भातील युक्तिवाद देखील पूर्णपणे चुकीचा आहे.
 • उपराष्ट्रपती नायडू यांच्यासह संघाच्या अनेक मोठ्या नेत्यांचे खातेदेखील ट्विटरने निष्क्रीय केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप मुंबईचे प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून हे भारताच्या संविधानावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. यासोबतच देशातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया यावर येत आहे.

ट्विटरचा ब्लू टिक व्हेरिफिकेशन कार्यक्रम काय आहे?

 • ट्विटर आणि फेसबुकसह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने एक व्हेरिफिकेशन कार्यक्रम तयार केला आहे. यानुसार, ब्लू टिक दिले जाते. केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येही हा महत्त्वाच्या नियमांचा समावेश होता.
 • केंद्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला म्हटले की, वापरकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार खात्याला व्हेरिफाइड करण्याची परवानगी दिली जावी. कारण यामुळे त्यांच्या चाहत्यांना आपण योग्य व्यक्तीला फॉलो करत असल्याचे कळेल.
 • त्यानंतरच, ट्विटरने दोन आठवड्यांपूर्वी आपल्या ब्लू टिक पॉलिसीला तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा सक्रिय केले. जर एखादे खाते व्हेरिफाइड असेल खातेधारक आणि चर्चेतील सहभागी लोकांमधील संभाषणे अधिक अर्थपूर्ण आणि माहिती देणारी असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

आपणदेखील आपल्या खात्याला व्हेरिफाईड करु शकतो का?

 • होय. ट्विटर येत्या काही दिवसांत आपल्या युजर्संना सेटिंग्समध्ये व्हेरिफिकेशन अॅप्लिकेशनची सुविधा देणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ब्लू टिकसाठी अर्ज करणार असेल तर काही दिवसांत तुम्हाला ई-मेलवर उत्तर मिळणार आहे.
 • ट्विटरने म्हटले आहे की, वापरकर्त्यांना प्रोफाइल नाव, प्रोफाइल फोटो आणि एक कन्फर्म केलेला ईमेलचा पत्ता किंवा फोन नंबर देणे आवश्यक आहे. कारण याच आधारावर ट्विटर आता त्या खात्याला व्हेरिफाइड करणार आहे. त्यामुळे ट्विटरने आपले अर्ज स्विकारलास आपल्या खात्याला ब्लू टिक लागणार आहे.
 • अर्ज नाकारल्या गेल्यास 30 दिवसांनी पुन्हा अर्ज करता येऊ शकते. या दरम्यान, ट्विटरची बॅकएंड टीम आपल्या खात्यावरून काही अनैतिक, बेकायदेशीर क्रियाकलाप सुरु आहे का? हे तपासते. त्याने बनविलेल्या नियमांची तपासणी केल्यावरच ते ब्लू टिक देणार आहे.
बातम्या आणखी आहेत...