आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Veterans To Face Fire Test, Short Term Soldier's 'fire Path', Protest Against New Military Policy

वीरांची होणार अग्निपरीक्षा:शॉर्ट टर्म सैनिकाचा ‘अग्निपथ’, नव्या लष्करी धोरणाविरोधात बिहारमध्ये जाळपोळ

दिल्‍ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शॉर्ट टर्म सैनिक योजना ‘अग्निपथ’ची घोषणा केल्याच्या पुढच्याच दिवशी बिहारमध्ये जाळपोळ करण्यात आली, तर अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी या धोरणावर प्रश्न उपस्थित केले. ४ वर्षे नोकरी केल्यानंतर जे अग्निवीर लष्करातून बाहेर पडतील त्यांचे भविष्य काय राहील याबाबत चिंता आहे. कारण ४ वर्षांनंतर फक्त २५% अग्निवीर सैनिकच सेवेत कायम राहतील. यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले की, जे ७५% अग्निवीर सेवेतून बाहेर जातील त्यांना आसाम रायफल्स किंवा अन्य केंद्रीय सशस्त्र दलांच्या भरतीत प्राधान्य दिले जाईल. गृह मंत्रालयानुसार, या वर्षी ४६ हजार अग्निवीर सैनिक भरती केले जातील. ही भरती दरवर्षी होईल. दुसरीकडे, आता आधीसारखी नियमित भरती होणार नाही का? झाल्यास त्यांची संख्या किती असेल? हे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात सरकारकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे भारतातील तरुण अद्याप साशंक आहेत.

रस्ते जाम, रेल्वेमार्ग ठप्प
अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी नवे धोरण भविष्याची गरज असल्याचे सांगितले. तर नव्या धोरणाचा सर्वाधिक विरोध बिहारमध्ये पाहायला मिळाला. या राज्यात ८ जिल्ह्यांच्या तरुणांनी रस्त्यांवर येत वाहतूक ठप्प केली आहे. रेल्वेमार्गांवर निदर्शने केली. एक वर्षापूर्वी लष्कर भरतीत फिजिकल-मेडिकल चाचणीत उत्तीर्ण झालेले, पण लेखी परीक्षेत नापास झालेले तरुणही आंदोलनात सहभागी झाले होते.

या आहेत चार प्रमुख शंका

-ही योजना का आणली?
सरकारला पेन्शन द्यावी लागणार नाही. दुसरीकडे लष्कर नेहमीसाठी अधिक तरुण राहील.

-विरोधाची कोणती कारणे आहेत?
विरोध दोन पातळ्यांवर होतोय. पहिली- तरुणांकडून. त्यांचे म्हणणे आहे, ४ वर्षांनंतर बेरोजगार होण्याची शक्यता राहील. दुसरी- अधिकारी सांगतात की, या योजनेमुळे व्यावसायिक लष्कराच्या मानकांशी तडजोड करण्याची वेळ येईल.

-कोणकोणत्या प्रकारच्या चिंता आहेत?
ले. जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा सांगतात, ४ प्रमुख चिंता आहेत.

पहिली- ट्रेनिंग कालावधी ६ महिन्यांचा आहे. तो कमी आहे. सैनिकाला दक्ष होण्यास खूप वेळ लागतो.

दुसरी- मोटिव्हेशन लेव्हल कमी होऊ शकते. सैनिक आपल्या युनिटला घर मानतो. मात्र, आपण केवळ ४ वर्षांसाठी आहोत असे एखाद्या सैनिकाला वाटले तर त्याची मोटिव्हेशन लेव्हल कमी होऊ शकते.

तिसरी- रेजिमेंटल सिस्टिमला धोका असेल. हा लष्कराचा मजबूत पाया आहे. जसे शीख लाइट इन्फ्रन्ट्री, जाट, डोगरा किंवा राजपूत. या रेजिमेंट कशा टिकतील? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही.

चौथी- सैनिकाला पहिल्या वर्षी कपातीनंतर २१ हजार मिळतील. आजच्या काळात हे कमी आहे.

माजी अधिकारी याला धोकादायक का म्हणतात?
ले. जनरल (निवृत्त) विनोद भाटिया सांगतात, दरवर्षी हजारो सैनिक बेरोजगार होतील. यामुळे समाजाच्या लष्करीकरणाचा धोका निर्माण होईल.

केंद्राचे अधिकारी योजना चांगली असल्याचे म्हणतात...
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे संयुक्त सविच पवन सेन म्हणतात, ही सर्वोत्तम योजना आहे. याचे तीन फायदे आहेत. पहिला- समाजाला लष्करातून आलेले शिस्तप्रिय तरुण नागरिक मिळतील. दुसरा- त्या तरुणाला रोजगार मिळेल. तिसरा- तो सेवाकाळात पदवीचे शिक्षण चालू ठेवत लष्करातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या कामासाठी पात्र ठरेल.

४ वर्षांत सैनिक बेरोजगार व्हावा हे गरजेचे आहे?
सैनिक ४ वर्षांनंतर बाहेर येईल तेव्हा त्याच्याकडे सुमारे १२ लाख रु. असतील. कमाल वय २५ वर्षे असेल. त्यामुळे दुसरे काम तो सुरू करू शकेल. मात्र, मागील आकडेवारीनुसार, १४ वर्षांनंतर लष्कर सोडणारे फक्त २% माजी सैनिकच दुसरी नोकरी मिळवण्यात यशस्वी ठरतात.

बातम्या आणखी आहेत...