आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • VHP Thrashes Muslim Students On Allegations Of Love Jihad In Surat College, Latest News And Update

सुरतच्या कॉलेजमध्ये कथित 'लव्ह-जिहाद':VHP कार्यकर्त्यांची मुस्लिम विद्यार्थ्यांना जबर मारहाण, हिंदू तरुणींना करत होते ब्लॅकमेल

सुरत7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या सुरतच्या भगवान महावीर कॉलेजमध्ये 3 मुस्लिम विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना उजेडात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) कार्यकर्त्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये शिरून विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांवर लव्ह जिहादचा आरोप केला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पण या प्रकरणी पोलिसांत अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आली नाही.

विहिंपच्या कार्यकर्त्यांना कॉलेजचे अनेक विद्यार्थी सुनियोजपणे हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढत असल्याची व काही मुलींना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे त्यांनी कॉलेजमध्ये स्टिंग ऑपरेशन करून आरोपी विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना मारहाण केली.

विहिंपच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या एका विशिष्ट धर्माच्या विद्यार्थ्यांना पकडले.
विहिंपच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या एका विशिष्ट धर्माच्या विद्यार्थ्यांना पकडले.

बोगस नावाने करत होते हिंदू मुलींशी चॅटिंग

याविषयी विहिंपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश नावडिया यांनी माध्यमांना सांगितले की, आमच्या कार्यकर्त्यांना महाविद्यालयातील काही मुस्लिम तरुण हिंदू मुलींशी जवळीक वाढवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांचे काही मुलींशी अपेयरही होते. एवढेच नाही तर ते सोशल मीडियावर बोगस नावाने अकाउंट उघडून हिंदू तरुणींशी चॅटिंगही करत होते. त्यांची ओळख पटवून आज त्यांना पकडण्यात आले.

यासंबंधीच्या माहितीनुसार, 3 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली.
यासंबंधीच्या माहितीनुसार, 3 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली.

संपूर्ण देशात कारवाई करणार - दिनेश नावडिया

विहिंप नेते दिनेश नावडिया यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचा शोध घेतला. त्यात या आरोपांत तथ्य आढळले. त्यांनी आम्ही संशयास्पद विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना समजावून सोडून देण्यात आले. पण त्यांनी भविष्यात असे कृत्य केले तर आम्ही त्यांना सोडणार नाही. सुरतच नव्हे तर संपूर्ण देशात लव्ह-जिहाद रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...