आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपराष्ट्रपती जगदीप धनखड याच आठवड्यात कंबाेडिया दाैऱ्यावर जाणार आहेत. आसियान परिषदेत ते सहभागी हाेणार आहेत. या बैठकीत सामरिक भागीदारी तसेच व्यापार, गुंतवणूक, संपर्क क्षेत्रात सहकार्य वाढीवर भर दिला जाणार आहे.
धनखड यांच्यासमवेत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरदेखील असतील. ११ नाेव्हेंबर ते १३ नाेव्हेंबरदरम्यान उपराष्ट्रपती द्विपक्षीय चर्चेतही सहभागी हाेतील. १२ नाेव्हेंबरला ही परिषद हाेणार आहे. गेल्या काही वर्षांत भारत आणि दहा देशांचा हा गट क्षेत्रीय विकास व शांततेसाठी प्रयत्नशील आहे. या परिषदेत भारताव्यतिरिक्त चीन, जपान, दक्षिण काेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका व रशियाचे प्रतिनिधी सहभागी हाेतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.