आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात 19 वर्षांच्या दलित मुलीबरोबर माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. 15 दिवस ती रुग्णालयात मृत्यूशी लढा देत राहिली, परंतू सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतरही पीडितेसोबत जी वागणूक झाली, ती माणुसकीला काळीमा फासणारी होती. तिच्या मृतदेहावर कोणत्याही अंतिम संस्काराशिवाय पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळून टाकला. पीडितेचा मृत्यू झाल्यापासून तिच्या गावाला छावणीचे स्वरुप आले आहे. पीडितेचे घर, छत, गल्ली सर्व ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल हिसकावून घेण्यात आले. मीडियाला काही सांगू नये यासाठी त्यांना धमकावण्यात आले. शुक्रवारी पीडितेचा लहान भाऊ पोलिसांपासून लपून मीडियापर्यंत पोहचला, यावेळी त्याने त्यांच्या घरावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली.
हाथरस जिल्हा प्रशासनाने गाव आणि जिल्ह्यात कलम 144 लागू केली आहे. पीडितेचा भाऊ गवत कापायच्या बहाण्याने घराबाहेर पडला आणि दिड किलोमीटर दूर असलेल्या मीडियाशी बातचीत केली. त्याने सांगितले की, 'घरातील सर्वांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत. माझ्या कुटुंबाला मीडियाशी बोलायचे आहे, पण पोलिस येऊ देत नाहीत. मी पोलिसांना चकवा देऊन इथपर्यंत आलो. माझ्या काकालाही मीडियाशी बोलायचे होते, पण पोलिसांनी त्यांना मारहाण केली.' पीडितेचा भाऊ मीडियाशी बोलत होता, तेवढ्यात एका पोलिसाची त्याच्यावर नजर पडली आणि तो पळून गेला.
यूपी काँग्रेसचा आरोप- जंगलराजची माहिती देत असल्यामुळे मीडियावर बंदी
यूपी काँग्रेसने ट्वीट करुन योगी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यात लिहीले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी अदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये मीडियाच्या येण्यावर बंदी घातली आहे. मीडियाने संपूर्ण देशासमोर सत्य आणले. योगीजीच्या जंगलराजचा खुलासा सर्व देशासमोर केला, त्यामुळे यूपीमध्ये माध्यमांवर बंदी घातली आहे.
हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्याने गुरुवारी धमकावले होते
हाथरस जिल्ह्यातील सामूहिक बलात्काराप्रकरणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते पीडित कुटुंबाला इशारा देत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकारी सांगत आहेत, 'तुमची विश्वासार्हता टिकवा. मीडिचा आज आहे, उद्या निघून जाईल. तुम्ही सरकारचं ऐका. तुम्ही सारी-सारी आपली साक्ष बदलू नका. तुमची इच्छा आहे, काय भरोसा, उद्या आम्हीपण बदलून जाऊ.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.