आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Video Made Sitting Near Girlfriend's Dead Body, Caught After Chasing 4000 KM I Latest News And Video  

प्रेयसीच्या मृतदेहाजवळ बसून बनवला होता VIDEO:दोन ब्लेडने गळा चिरला; मध्यप्रदेशातून राजस्थानात पळालेला आरोपी अटक

अजमेर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
हत्येनंतर आरोपी हेमंतने शिल्पाच्या मृतदेहासोबत व्हिडिओ बनवला होता.

श्रद्धा हत्याकांडाची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. अशीच एक थरारक व अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. जबलपूरच्या मेखला रिसॉर्टमध्ये एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीचा गळा आणि हात ब्लेडने कापून तिचा खून केला होता. ही घटना दहा दिवसांपूर्वीच आहे.

धक्कादायक म्हणजे या आरोपी प्रियकराने तिच्या मृतदेहाशेजारी बसून व्हिडिओ शूट केला. त्यानंतर त्याने राजस्थान गाठले. या फरार आरोपीला अखेर पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. दरम्यान, आरोपी दहा दिवसात चार राज्यात गेला होता. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने अखेर त्याला अटक केली आहे. हेमंत ऊर्फ अभिजीत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर खून झालेल्या मुलीचे नाव शिल्पा आहे.

...नाहीतर तो महाराष्ट्रात गेला असता

राजस्थानमध्ये जर पोलिसांच्या तो हातात लागला नसता. तर तो गुजरात आणि नंतर महाराष्ट्रात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र मध्य प्रदेश पोलिसांच्या माहितीवरून त्याला गुरूवारी सिरोही येथून अटक केली आहे. यापूर्वी अजमेरमधील एटीएममधून त्याचे लोकेशन ट्रेस करण्यात आले होते. आरोपीला सिरोही पोलिसांनी शुक्रवारी जबलपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

7 नोव्हेंबरला प्रेयसीची केली होती हत्या

7 नोव्हेंबर रोजी प्रेयसी शिल्पाची हत्या प्रियकर हेमंत उर्फ ​​अभिजीत याने केली होती. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. सर्वप्रथम तो जबलपूर चंदीगडला गेला होता. यानंतर तो हिमाचल आणि दिल्लीमार्गे 17 नोव्हेंबरला अजमेरला पोहोचला. याठिकाणी त्यांनी बसस्थानकात लावलेल्या एसबीआयच्या एटीएममधून 20 हजार रुपये काढले होते. येथूनच त्याची माहिती बँकेमार्फत जबलपूर पोलिसांना मिळाली. यानंतर याची माहिती अजमेर पोलिसांना देण्यात आली. मात्र, त्यापूर्वीच आरोपी हेमंत खासगी बसमधून सिरोहीकडे रवाना झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत पहाटे बसने अजमेरला पोहोचला होता. या ठिकाणी त्याने पैसे काढून लगेच बस पकडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत पहाटे बसने अजमेरला पोहोचला होता. या ठिकाणी त्याने पैसे काढून लगेच बस पकडली.

त्यावर अजमेरसह ठिकठिकाच्या पोलिस चौकीला बस थांबवून तपासणी सुरू करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींना उदयपूर-पालनपूर महामार्गावरील स्वरूपगंज पोलीस ठाण्यासमोर अटक केली.

सातत्याने घटनास्थळ बदलत होता

मारेकरी हेमंतने 10 दिवसांत 4 हजार किलोमीटरचा प्रवास केला. प्रथमत: हरियाणातील रेवडी येथे आरोपीचे लोकेशन सापडले. जबलपूर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. परंतु, धूर्त हेमंत उर्फ ​​अभिजीत प्रत्येक वेळी पोलिस पोहोचण्यापूर्वीच आपले ठिकाण बदलत असे.

स्वरूपगंज (सिरोही) पोलिस स्टेशनचे अधिकारी हरिसिंह राजपुरोहित यांनी सांगितले की, जबलपूर मध्यप्रदेश पोलिसांच्या अनेक पथके महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थानमध्ये सतत पाठपुरावा करत आहेत. आरोपी अजमेरहून महाराष्ट्राच्या दिशेने बसमध्ये जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने नियोजन करून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. लक्झरी बसमधून आरोपीला अटक करण्यात आली.

गुरुवारी सायंकाळी तपासादरम्यान सिरोही पोलिसांनी मारेकऱ्याला पकडले. त्यानंतर ही माहिती मध्य प्रदेश पोलिसांना देण्यात आली.
गुरुवारी सायंकाळी तपासादरम्यान सिरोही पोलिसांनी मारेकऱ्याला पकडले. त्यानंतर ही माहिती मध्य प्रदेश पोलिसांना देण्यात आली.

काय आहे प्रकरण घ्या जाणून
8 नोव्हेंबर रोजी दुपारी शिल्पाचा मृतदेह जबलपूरच्या मेखला रिसॉर्टच्या 5 क्रमांकाच्या खोलीत रजईत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला. शिल्पाचा छळ करून तिच्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापून तिची हत्या करण्यात आली. या संपूर्ण हत्याकांडाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर फरार आरोपी हेमंत सद्या जबलपूर येथे राहत होता. हेमंत आणि शिल्पा 6 नोव्हेंबरला मेखला रिसॉर्टमध्ये पोहोचले. या दिवशी ती रिसॉर्टमध्ये दिसली होती. पण 7 नोव्हेंबरला ती दिवसभर दिसलीच नव्हती.

या हत्येनंतर जबलपूर पोलिसांची अनेक पथके मारेकऱ्याच्या शोधात गुंतली होती, मात्र आरोपीने वारंवार लोकेशन बदलत राहिल्याने त्याला पकडण्यासाठी दहा दिवस लागले.
या हत्येनंतर जबलपूर पोलिसांची अनेक पथके मारेकऱ्याच्या शोधात गुंतली होती, मात्र आरोपीने वारंवार लोकेशन बदलत राहिल्याने त्याला पकडण्यासाठी दहा दिवस लागले.

आरोपीच्या गालात लगावली

  • जबलपूर येथील शिल्पा झरिया हत्याकांडातील आरोपी अभिजीत उर्फ ​​हेमंत हा फरार होता. अटकेनंतर, 19 नोव्हेंबर रोजी, न्यायालयात हजर करत असताना आरोपी हेमंतला पोलिसांसमोरच एका व्यक्तीने जोरदार गालात लगावली. तरीही पोलिसांनी त्याला दूर ढकलले. आरोपी अतिशय चातुर चोर होता. त्याच्यावर महाराष्ट्रात चोरीचे 37 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याला शिल्पा इतर पुरुषांशी बोललेली आवडत नव्हती. त्यामुळेच त्याने प्लॅन बनवून तिची हत्या केली.
  • त्याच्याकडे 3 महिन्यांपूर्वी जबलपूरमध्ये बनावट आधार कार्ड बनवल्याचेही तपासात समोर आले आहे. हे आधारकार्ड घेऊन आरोपी जबलपूरच्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहायचे. यामध्ये त्याने आपले नाव अभिजीत पाटीदार लिहिले आहे. जे त्याचे खरे नाव नाही. पोलिस चौकशीत त्याचे हेमंत भादोडे (नाशिक, राज्य- महाराष्ट्र) असे आपले नाव सांगितले आहे.
  • आता आरोपींचे आधार कार्ड कोणी बनवले हा देखील पोलिसांसाठी तपासाचा विषय आहे. अटकेनंतर पोलिसांनी आरोपी हेमंतकडून शिल्पाचा मोबाईल फोन, चेन, अंगठी आणि 1 लाख 52 हजार रुपये रोख जप्त केले. पळून गेलेल्या मदतनीसांचीही चौकशी सुरू आहे.
खोलीतील बेडवर रजाईत गुंडाळलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला. आरोपी तरुणाने या खोलीत त्याचा व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते - बेवफाई करू नका.
खोलीतील बेडवर रजाईत गुंडाळलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला. आरोपी तरुणाने या खोलीत त्याचा व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते - बेवफाई करू नका.

शिल्पाचे इतर पुरुषांसोबतचे फोटो पाहीले अन् मारून टाकले

अभिजीत उर्फ ​​हेमंतने पोलिसांना सांगितले की, त्याचे शिल्पावर प्रेम होते. तिच्याशी लग्न करायचे होते. त्याने शिल्पाचे इतर पुरुषांसोबतचे फोटो तिच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपवर पाहिले होते. यामुळे शिल्पाच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला होता. त्याने मुलीला इतर पुरुषांशी बोलू नको, त्यांच्याशी असलेले नाते संपवून टाक, असा सल्लाही दिला होता. पण शिल्पा इतर पुरुषांना डेट करत राहिली. अभिजीतच्या म्हणण्यानुसार, तो जेव्हाही शिल्पाला फोन करायचा. तेव्हा तिचा मोबाइल नेहमी व्यस्त असायचा. त्यामुळे शिल्पावरील संशय अधिकच बळावला. मेखला रिसॉर्टमध्ये प्लॅन केल्यानंतर ब्लेडने वार करून तिची हत्या केली होती.

आरोपी तरुणाव्यतिरिक्त शिल्पाचे इतर मुलांसोबतचे फोटोही सोशल मीडियावर आढळून आले आहेत. शिल्पा भोखा ही देवरी गावची रहिवासी होती. ती 3 वर्षांपासून जबलपूरच्या गोरखपूर भागात भाड्याने खोली घेऊन राहत होती. ब्युटी पार्लरमध्ये काम करून ती आपला उदरनिर्वाह करत होती, असे तिचे नातेवाईक सांगतात. ती गावाला फार कमी वेळा यायची. या दिवाळीत ती शेवटची गावी गेली होती.

शिल्पाच्या इंस्टाग्राम पेजवर मंगळवार आणि बुधवारी काही फोटो अपलोड करण्यात आले होते. हे गुरुवारी हटवण्यात आले.
शिल्पाच्या इंस्टाग्राम पेजवर मंगळवार आणि बुधवारी काही फोटो अपलोड करण्यात आले होते. हे गुरुवारी हटवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...