आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: ट्रकची कारला धडक:​​​​​​​मैनपुरीत सप नेत्याच्या कारला मारली टक्कर; म्हणाले -हा मला ठार मारण्याचा प्रयत्न

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटना रविवारी सायंकाली भदावर हाऊसच्या पुढे घडली. कारमध्ये सपचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यादव होते.

उत्तर प्रदेशच्या मैनपुरीत रविवारी सायंकाळी भरधाव वेगातील एका ट्रकने कारला धडक दिली. त्यानंतर हा ट्रक कारला तब्बल 700 मीटरपर्यंत फरफटत घेऊन गेला. या घटनेमुळे स्थानिकांनी ट्रकचा पाठलाग करत अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केला. विशेष म्हणजे कारच्या मागे असणारा एक दुचाकी स्वारही या अपघाताच्या विळख्यात सापडला.

ही धडक एवढी वेगवान होती की वाहनांच्या टकरीने रस्त्यावर आगीच्या ठिणग्या उडत होत्या. रविवारी सायंकाळी भदावर हाऊसपुढे एका भरधाव वेगातील ट्रकने प्रथम एका दुचाकीस्वाराला तर त्यानंतर कारला धडक दिली. कारमध्ये सपचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह होते. ते आपल्या करहल रोडवर स्थित निवासस्थानी निघाले होते. घटनेत सिंह यांना साधे खरचटलेही नाही. पण दुचाकीस्वार रुग्णालयात पोहोचला आहे.

याच कारमध्ये सप जिल्हाध्यक्ष होते.सुदैवाने ते बचावले. पण ट्रकच्या धडकेमुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे.
याच कारमध्ये सप जिल्हाध्यक्ष होते.सुदैवाने ते बचावले. पण ट्रकच्या धडकेमुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे.

ट्रक चालकाने दोनवेळा धडक दिली -सप नेत्याचा आरोप

देवेंद्र सिंह यादव म्हणाले -"मी सप कार्यालयातून घरी जात होतो. भदावर हाऊसजवळ पाठीमागून ट्रक येत होता. प्रथम ट्रकने हलकी ठोकर मारली. त्यानंतर आम्ही सावध होऊन गाडी पुढे नेली. पण ट्रकने कारला दुसऱ्यांदा धडक दिली. यामुळे आमची कार कलंडली. त्यानंतर ट्रकने कारला फरफटत नेले. ट्रक चालकाने गाडी मागे घेऊन दोनवेळा आम्हाला टक्कर मारली. आम्हाला जवळपास 700 मीटर फरफटत नेले. हा आमच्या हत्येचा प्रयत्न होता. यामागे कुणाचातरी हात आहे."

हे छायाचित्र सप जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यादव यांचे आहे. त्यांनी हा अपघात नव्हे तर घात असल्याचा आरोप केला आहे.
हे छायाचित्र सप जिल्हाध्यक्ष देवेंद्र सिंह यादव यांचे आहे. त्यांनी हा अपघात नव्हे तर घात असल्याचा आरोप केला आहे.

तपास सुरू -पोलिस

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी विक्रम सिंह यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले -"आरोपी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. विनय यादव असे त्याचे नाव आहे. तो इटावाच्या चौबियाचा आहे. या प्रकरणी अजून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तपास सुरू आहे."

बातम्या आणखी आहेत...