आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेची 12 व्या मजल्यावरून उडी, VIDEO:जिथे पडली तिथेच खेळत होता तिचा 8 वर्षांचा मुलगा; स्कूल बॅगमध्ये आढळली सुसाईड नोट

सूरतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत येथील एका महिलेने मुलाच्या डोळ्यापुढे 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. महिला ज्या ठिकाणी पडली, तिथेच तिचा 8 वर्षीय मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत होता. तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय करत होता. त्याला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

मुलाच्या स्कूल बॅगमध्ये ठेवली होती सुसाईड नोट

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगितले की, आरती (34) आपल्या 8 वर्षीय मुलाला घेऊन ट्यूशनवरून घरी आली होती. तिने आपल्याला मुलाला त्याची बॅग शेजारच्या मावशीकडे ठेवण्याची सूचना केली. त्यानंतर मुलगा बॅग मावशीकडे ठेवून मित्रांसोबत इमारतीखाली खेळण्यासाठी गेला. तेवढ्यात महिलेने 12 व्या मजल्यावरून उडी मारली. ती जिथे पडली तिथे तिचा मुलगा खेळत होता. मुलाच्या बॅगमध्ये एक सुसाईड नोटही आढळली आहे.

जमिनीवर पडताच महिलेची प्राणज्योत मालवली.
जमिनीवर पडताच महिलेची प्राणज्योत मालवली.

पती 9 वर्षांपासून देत होता त्रास

आरती मेहसाणा जिल्ह्यातील होती. तिचे लग्न सूरतच्या मनोज सिंह याच्याशी झाले होते. लग्नानंतर पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला त्रास देत होता. मागील 9 वर्षांपासून सुरू असणाऱ्या या छळाला कंटाळून अखेरीस तिने आपली जिवनयात्रा संपवल्याची माहिती आहे. महिलेच्या पतीविरोधात या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका दिवसापूर्वीच अहमदाबादेत कॉन्स्टेबलने 3 वर्षीय मुलगी व पत्नीसह आत्महत्या केली होती

बुधवारीच अहमदाबाद शहरात आत्महत्येची एक भयंकर घटना घडली होती. येथील सोला भागात राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने आपली 3 वर्षीय मुलगी व पत्नीसह 12 व्या मजल्यावरून उडी घेत आत्मत्या केली होती. तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या आत्महत्येचे कारण अद्यपा स्पष्ट झाले नाही.

बातम्या आणखी आहेत...