आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Video Shared On Deepu Sidhu's Facebook Page, Statements Of Leaders Who Instigate Farmers In The Video

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाल किल्ला हिंसा प्रकरण:तुरुंगात असलेल्या दीप सिद्धूच्या सोशल मीडियावरुन व्हिडिओ जारी, टिकैत आणि लक्खासह 6 लोकांचे भडकाऊ भाषणे दाखवली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या व्हिडिओमध्ये दीप सिद्धू आंदोलकांना समजावताना दिसत आहेत.

26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिद्धू तुरूंगात आहे, परंतु पुन्हा एकदा त्याच्या फेसबुक अकाऊंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दीप सिद्धूने स्वत: ला निर्दोष घोषित केले आहे आणि शेतकरी नेत्यांची भडकाऊ भाषणे दाखवली आहेत. या व्हिडिओमध्ये दीप सिद्धू आंदोलकांना समजावताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत, शेतकरी नेते गुरनाम चढनी आणि एक लाखांचे बक्षिस असलेले कार्यकर्ते लखबीरसिंग उर्फ ​​लक्खा सिधाना यांची भडकाऊ भाषणे आहेत.

7 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये 7 लोकांची वक्तव्य
व्हिडिओमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे वक्तव्य आले आहे. ज्यामध्ये ते ट्रॅक्टर रोखणे आणि दिल्ली पोलिसांना धमकी देताना दिसत आहेत.

2. लक्खा सिधाना
गँगस्टर नंतर सोशल अॅक्टिविस्ट बनलेला लक्खा सिधाना व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर परेडचा ठरलेला मार्ग तोडण्याचा इशारा करत आहेत. ते म्हणत आहेत की, आमचे ट्रॅक्टरही रिंग रोडकडे जातील.

3. राजिंदर सिंह दीप
व्हिडीओमध्ये कीर्ती किसान संघटनेचे राजिंदर सिंह हे व्हिडिओत असे म्हणत आहेत की 26 जानेवारी रोजी सर्व ट्रॅक्टर पॉईंट्सवर उभे करा आणि या दिवशी मोदींची चर्चा होऊ नये, तर त्याऐवजी मोदींच्या मानेवर ट्रॅक्टर चढण्यावर चर्चा व्हायला हवी.

4. गुरुनाम सिंह चढ़ूनी
या व्हिडिओत हरियाणाचे शेतकरी नेते गुरनामसिंग चढूनी सरकारला इशारा देताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की 26 रोजी आपली तयारी करा आणि ट्रॅक्टर घेऊन या. जबरदस्तीने बॅरिकेड्स तोडून दिल्लीत प्रवेश करू. सरकारने गोळ्या मारो, लाठ्या मारो, जे करायचे आहे त्यांना करु द्या. 26 तारखेला फायनल मॅच होईल.

5. सतनाम सिंह पन्नू
सतनाम सिंह पन्नूचे हे वक्तव्य आले आहे, त्यामध्ये ट्रॅक्टर परेडचा मार्ग तोडण्याची चर्चा झाली आहे. पन्नू म्हणत आहेत की, पोलिसांसोबत चर्चा करत आहोत की, रिंग रोडवरच जाईल. जर त्यांनी मान्य केले तर ठिक, नाही मानले तरीही तिथे जाऊ. पाहू सरकार काय करते.

6. सरवन सिंह पंढेर
शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर म्हणत आहेत की, ट्रॅक्टर परेडच्या दिवशी लाल किल्ल्यावर जाऊन बसा. तिथून पुढे जाऊ नका.

7. दीप सिद्धू
7 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दीप सिद्धूचे 25 जानेवारीच्या रात्रीचे भाषण दाखवण्यात आले. हे भाषण सिंघु बॉर्डरवरच देण्यात आले होते. मंचावर उभा दीप सिद्धू जमावाला समजावताना दिसत आहे की, ट्रॅक्टर परेडसाठी जो मार्ग ठरवण्यात आला आहे, त्यावरच जाण्याचा निर्णय घ्या. एकी बनवून ठेवा.

बातम्या आणखी आहेत...