आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Videography In The Security System In The Gyanvapi Mosque Premises, Sloganeering Against The Court Order

वादंग:ज्ञानवापी मशीद परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्थेत व्हिडिओग्राफी, कोर्ट आदेशाच्या विरोधात घोषणाबाजी

वाराणसी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसीतील काशी विश्वनाथजवळील ज्ञानवापी मशीद परिसरात श्रंृगार गौरी व इतर देवतांची व्हिडिओग्राफी व पाहणीचे काम विरोध-निदर्शनांत पूर्ण करण्यात आले. पाहणीच्या विरोधात शुक्रवारी दुपारच्या नमाजसाठी सुमारे अडीच हजार लोक ज्ञानवापी मशिदीत दाखल झाले होते. सामान्यपणे शुक्रवारच्या नमाजसाठी २००- ३०० लोक एकत्र येतात. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने ज्ञानवापी मशिदीला चारही बाजूंनी अस्थायी स्वरूपात झाकले आहे. बाहेरून कोणीही व्हिडिओग्राफी करू नये, असा त्यामागील उद्देश होता. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते.

९ मेपर्यंत अहवाल द्या, १० रोजी सुनावणी कोर्टाने याप्रकरणी पूर्वीचा आदेश कायम ठेवत पाहणी करण्याचे आदेश दिला होता. पाहणी अहवाल ९ मे रोजी सादर करावा. १० मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

सुरक्षा व्यवस्थेत पाहणी करणारी टीम तीननंतर येथे दाखल झाली. पाहणीच्या कारवाईसाठी आयुक्तांसोबतच हिंदू व मुस्लिम पक्षाचे वादी, प्रतिवादी अशा ३६ जणांना प्रवेश देण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...