आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Videography Instructions Given To Govt | No Hate Speech At Hindu Organization's Event: Court

सरकारला व्हिडिओग्राफीचे दिले निर्देश:हिंदू संघटनेच्या कार्यक्रमात द्वेषपूर्ण भाषणे नकोत : कोर्ट

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चात कोणतेही द्वेषपूर्ण भाषण होऊ नये, याची महाराष्ट्र सरकारने काळजी घ्यावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कोर्टाने म्हटले की, कार्यक्रमात कुणीही द्वेषपूर्ण भाषण करू नये या अटीवरच ५ फेब्रुवारीला मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला परवानगी दिली जावी.

राज्य सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, द्वेषपूर्ण भाषणे होणार नाहीत, या अटीवरच सरकार परवानगी देईल. न्यायमूर्ती के.एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला यांच्या पीठाने म्हटले, कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी केली जावी. सुप्रीम कोर्टात शाहीन अब्दुल्ला यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेत म्हटले की, मुंबईत २९ जानेवारीसारखी पुनरावृत्ती होऊ नये. तेव्हाच्या कार्यक्रमात विशेष समुदायाबाबत द्वेषपूर्ण भाषणे झाली होती. या वेळी मेहता यांनी प्रश्न उपस्थित केला की, शेवटी केरळच्या व्यक्तीला महाराष्ट्रात होणाऱ्या कार्यक्रमाविषयी एवढी काळजी का वाटतेॽ काही निवडक प्रकरणांसाठी सुप्रीम कोर्टाचा दुरुपयोग केला जात आहे. कोर्टाने अशा याचिकांवर सुनावणी घेऊ नये.

बातम्या आणखी आहेत...