आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vidhansabha Election 2022 | State Assembly Election 2022 | Marathi News | Lifted The Ban On Actual Rallies In The States Where Elections Are To Be Held; Decision Of The Election Commission After The Outbreak Of Corona

विधानसभा निवडणूक 2022:निवडणूक होणाऱ्या राज्यांमधील प्रत्यक्ष रॅलीवरील बंदी उठवली; कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचा वेग मंदावल्यानंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना फिजिकल रॅली काढण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष प्रचारासाठी ग्राउंड आणि हॉलचा वापर करू शकतात. मात्र रॅलीत सहभागी होताना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. रोड-शो आणि वाहन रॅलीवर 11 फेब्रुवारीपर्यंत बंदी कायम असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना प्रचारासाठी काहीशी मुभा दिली आहे.

या नियमांचे करावे लागणार पालन

1. आयोगाने निर्णय घेतला आहे की, 1 फेब्रुवारीपासून, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार 1000 लोकांसह किंवा त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 50 टक्के (जे कमी असेल) नियुक्त मोकळ्या जागेवर सार्वजनिक सभा घेऊ शकतात. यापूर्वी ही मर्यादा 500 लोकांपर्यंत निश्चित करण्यात आली होती.

2. याशिवाय, आयोगाने उमेदवारांच्या घरोघरी जाऊन निवडणूक प्रचार करण्याच्या नियमांमध्येही शिथिलता दिली आहे. आता पूर्वीच्या 10 जणांऐवजी 20 जणांना एकाच वेळी घरोघरी जाऊन प्रचारात सहभागी होता येणार आहे. त्यांच्यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची गणना केली जाणार नाही.

3. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना जास्तीत जास्त 500 लोकांच्या किंवा हॉल-रूम क्षमतेच्या 50 टक्के (जे कमी असेल) अशा बंद जागांवर बैठक घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यापूर्वी ही मर्यादा 300 लोकांपर्यंतच होती.

4. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना कोरोनाचे पालन करुन वागण्याचा आणि त्याचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय निवडणुकीशी संबंधित कामे आचारसंहितेअंतर्गत करण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत.

5. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, जारी केलेल्या बदलांव्यतिरिक्त, महामारीच्या पार्श्वभूमीवर 8 जानेवारी 2022 रोजी जारी करण्यात आलेल्या निवडणुकांशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

यामुळे घातली होती बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रचार रॅलींना बंदी घातली होती. सुरुवातीला आयोगाने 15 जानेवारीपर्यंतच बंदी घातली होती. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आयोगाने या कालावधीत वाढ केली होती. त्यानंतर 31 जानेवारीपर्यंत आयोगाने बंदी कायम ठेवली होती. मात्र आता देशात कोरोनाचे रुग्ण कमी सापडत असल्याने, निवडणूक आयोगाने प्रचार रॅलीला काही अटींसह परवानगी दिली आहे. देशात गेल्या 24 तासात 2 लाख 9 हजार 918 कोरोना रुग्ण आढळले होते.

पाच राज्यांमध्ये होणार निवडणूका

देशातील पाच राज्यांमध्ये येत्या 10 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपुर, गोवा या राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर मणिपुरमध्येही दोन टप्प्यात निवडणूक होईल. तर पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच दिवसात मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या पाचही राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्चला समोर येतील.

बातम्या आणखी आहेत...