आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vijay Has Been Tracking The Artifacts Stolen From The Country And Taken Abroad For 16 Years

चेन्नई:देशातून चोरून विदेशात नेलेल्या कलाकृतींना 16 वर्षांपासून ट्रॅक करताहेत विजय, 200 पेक्षा जास्त परत आणण्यात मिळाले यश

चेन्नई / आर. रामकुमार15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच अमेरिका दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यासोबत १५७ ऐतिहासिक व बहुमूल्य देवतांच्या मूर्ती आणि कलाकृती आणल्या आहेत. यानंतर चेन्नईचे विजयकुमारही चर्चेत आले. विजय हे हे गेल्या १६ वर्षांपासून कलात्मक वस्तूंची ट्रॅकिंग करत आहेत, ज्या चोरी वा तस्करीच्या माध्यमातून देशातून बाहेर गेल्या आहेत आणि त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री झाली आहे. भारताचा अभिमान देशात परत आणण्याची कहानी त्यांच्याच शब्दात वाचा...

लहानपणापासून इतिहासात रस आहे. त्यामुळे शिपिंग कंपनीत जीएम झाल्यानंतर २००६ मध्ये देशाच्या वारशाच्या दस्तऐवजीकरणाचे काम सुरू केले. इंडिया प्राइड प्रोजेक्टअंतर्गत(आयपीपी) ब्लॉग आणि विविध मंचांवर यावर लिहीत होतो. २००८ मध्ये मला लक्षात आले की, तामिळनाडूच नव्हे तर देशाच्या कलात्मक वारशाचा मोठा हिस्सा बाहेर गेला आहे. जगातील अनेक देश फिरताना देशातील मंदिर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील गायब झालेल्या मूर्ती, कलाकृती विदेशातील संग्रहालयात व लिलावगृहात ठेवल्याचे दिसून आले. हे पाहून धक्काच बसला. काहीशा रुपयांत एवढ्या महत्त्वाच्या वस्तू देशाबाहेर गेल्या होत्या. मी या कलाकृती परत आणण्यासाठी इंटरपोलला जोडून २००८ पासून संघटित गुन्हेगारीविरुद्ध काम करत आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणारे आर्ट डीलर सुभाष कपूरना या संदर्भात अटक करवली. मी ११ व्या, १२ व्या शतकातील बहुमोल मूर्ती परत आणण्यात मदत केली.

आयपीपीच्या माझ्या टीमने चोरलेल्या मूर्तींची ट्रॅकिंग केली आहे आणि त्यांना परत आणण्यासाठी अंमलबजावणी संस्थांना पुरावेही उपलब्ध केले. नुकतेच देशात आणलेल्या कलाकृतींमध्ये निम्म्या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये १० व्या शतकात बलुआ दगडपासून बनवलेल्या रेवंतच्या दीड मीटर लांब पॅनलपासून १२ व्या शतकातील कांस्यच्या नटराज मूर्तीचा समावेश आहे. तुम्ही कॅगचा अहवाल पाहिल्यास १९४७ ते २००० पर्यंत विदेशातून कलाकृती परत केल्या. २००० पासून २०१२ दरम्यान एकही नाही. हे लक्षात आल्यानंतर बॅकग्राउंडवर काम केले. आंतरराष्ट्रीय अंमलबजावणी संस्थांनीही आम्हाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. २०१३ नंतर आम्ही बऱ्याच मिळवल्या. आतापर्यंत २०० कलाकृती परत आणल्या आहेत. यापैकी ९५% आणण्यात वा अंमलबजावणी संस्थांना सांगण्यात आयपीपीचे योगदान आहे. टीमचे सदस्य भारतीय कलेबाबत भावुक आहेत. ते जुने कॅटलॉग शोधून लिलावगृहात ठेवलेल्या मूर्ती ओळखतात. त्या जिथून चोरल्या त्या ठिकाणाशी जोडण्याच्या प्रयत्नात असतात.’ -विजयकुमार

बातम्या आणखी आहेत...