आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vijay Mallya ; Fugitive Liquor Businessman Vijay Mallya Again Pleaded With The Government, Take All The Outstanding Debt And Close The Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्यर्पणाची भीती:फरार विजय मल्ल्या म्हणतो, माझ्यावर असलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम भरतो, बदल्यात माझ्याविरुद्धचे खटले बंद करा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्यर्पणाच्या भीतीने कर्जाची शंभर टक्के परतफेड करण्याची मल्ल्याची ऑफर

भारतात हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार होत लंडनमध्ये राहणाऱ्या विजय मल्ल्याला आता प्रत्यर्पणाची भीती वाटत आहे. त्याने आपल्या डोक्यावर असलेले संपूर्ण कर्ज भरण्याची पुन्हा तयारी दर्शवली आहे. आपल्यावर असलेले बँकांचे संपूर्ण कर्ज परत फेडतो पण माझ्याविरुद्ध चालणारे सर्वच खटले बंद करावे असे आवाहन विजय मल्ल्याने ट्विट करून केले आहे. ब्रिटनमध्ये सध्या विजय मल्ल्याच्या भारतात प्रत्यर्पणाच्या प्रयत्नांना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतातील तुरुंगापासून वाचण्यासाठी त्याने हे ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारच्या संबोधनात लॉकडाउनमुळे डबघाईला गेलेल्या अर्थव्यवस्थेला 20 लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जारी केले. त्यावर बोलताना विजय मल्ल्याने भारत सरकारला अभिनंदन केले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नुकसानपासून वाचवण्यासाठी सरकार अर्थव्यवस्थेला लाखो कोटी रुपयांची मदत करू शकतो. त्यांना हवे तेवढे पैसे ओतू शकते. परंतु, माझ्यासारखा छोटेशे योगदान देऊ इच्छितो. माझ्यावर असलेले संपूर्ण कर्ज भरतो. बदल्यात माझ्याविरुद्धचे खटले रद्द करा असे विजय मल्ल्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे. मल्ल्याने यापूर्वी सुद्धा अनेकवेळा आपली संपत्ती सील करून पैसे वसूल करण्याचा प्रस्ताव दिला. एवढेच नव्हे, तर आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनमध्ये पगार देता यावा यासाठी माझी ऑफर स्वीकारावी असेही ट्विट त्याने नुकतेच केले होते.

विजय माल्या भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढून परतफेड करू शकला नाही. यानंतर 2016 मध्ये तो देश सोडून लंडनला पसार झाला. आता हेच कर्ज तो बिनशर्त परत करण्याची ऑफर सरकारला देत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, लंडनच्या कोर्टाने गेल्या महिन्यातच त्याच्या भारतात प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा केला. तसेच मल्ल्याचे अपील सुद्धा धुडकावून लावले. यानंतर त्याने हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

मल्ल्याच्या खटल्यातील आतापर्यंतचे अपडेट

2 मार्च 2016 रोजी विजय मल्ल्या लंडनमध्ये पसार झाला. 21 फेब्रुवारी 2017 रोजी भारत सरकारच्या गृह सचिवालयाने ब्रिटनमध्ये त्याच्या प्रत्यर्पणासाठी अर्ज केला. 18 एप्रिल रोजी मल्ल्याला अटक आणि त्याच दिवशी जामीनावर सुटका करण्यात आली. 24 एप्रिल 2017 रोजी मल्ल्याचे भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आले. 2 मे 2017 रोजी त्याने राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 13 जून 2017 रोजी वेस्टमिंस्टर कोर्टात त्याच्या प्रत्यर्पणाची सुनावणी सुरू झाली. 10 डिसेंबर 2018 रोजी त्याच्या प्रत्यर्पण देऊन फाइल गृह सचिवांना पाठवली. गृह सचिवांनी 3 फेब्रुवारी 2019 रोजी प्रत्यर्पणाचे आदेश दिले. 5 एप्रिल रोजी इंग्लंड आणि वेल्स हायकोर्टाने अपील करण्यासाठी स्वाक्षरी देण्यास नकार दिला. 2 जुलै 2019 रोजी अपील करण्याची परवानगी देण्यात आली. 20 एप्रिल 2020 रोजी मल्ल्याचे अपील फेटाळण्यात आले. तसेच अंतिम निर्णय गृह सचिवांकडे सोपविला.

बातम्या आणखी आहेत...