आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेगा एम्पायर:विजय मल्ल्याच्या किंगफिशरची कहाणी; बिअरची बैलगाडीवरून केली डिलिव्हरी, पण एअरलाइनमुळे हवेतून जमिनीवर

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'फ्लाय द गुड टाइम्स' व 'द टेस्ट ऑफ रिअल इंडिया'... या 2 टॅगलाइन एकाच कंपनीच्या आहेत. पण उत्पादने वेगवेगळी आहेत. 1 उत्पादन विमान कंपनी व दुसरे पेय. एअरलाइन 20 ऑक्टोबर 2020 रोजी बंद झाली. पण बिअर अजूनही 34% पेक्षा जास्त शेअरसह भारतीय बाजारपेठेत आघाडीवर आहे. या कंपनीचे नाव आहे… Kingfisher.

2016 पर्यंत या कंपनीचे मालक विजय मल्ल्या आपल्या हाय प्रोफाइल आयुष्यासाठी ओळखले जात होते. त्यांना एकेकाळी 'द मॅन ऑफ गुड टाइम्स' म्हटले जायचे. पण गत काही वर्षांपासून त्यांचे दिवस फिरलेत. त्यांच्या वाईट दिवसांचे कारण बनलेली किंगफिशर एअरलाइन्स पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे देशातील तिसरी सर्वात मोठी विमान कंपनी गो-फर्स्टने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला आहे. पण आजही ही कंपनी शीतपेयांच्या बाजारपेठेत स्वतःच्या बळावर अस्तित्वात आहे.

चला तर मग आजच्या मेगा एम्पायरमध्ये पाहूया किंगफिशरच्या साम्राज्याची कहाणी...

1857 मध्ये बिअर बनवण्याचा प्रवास सुरू

आज आपल्याला माहीत असलेली किंगफिशर बिअर युनायटेड ब्रुअरीज ग्रुपचा (UB) भाग आहे. 1915 मध्ये स्कॉटमॅन थॉमस लीशमन नावाच्या व्यक्तीने दक्षिण भारतातील 5 डिस्टिलरीज एकत्र करून हा समूह तयार केला. 1857 मध्ये स्थापन झालेल्या या 5 डिस्टिलरीजपैकी कॅसल डिस्टिलरी ही सर्वात जुनी होती. युनायटेड, निलगिरीस, बंगलोर ब्रूइंग कंपनी व ब्रिटिश ब्रूइंग कंपनी या ब्रुअरीजचाही यात समावेश होता.

त्यावेळी काही वर्षांत या कामाने वेग घेतला. बैलगाड्यांवर मोठमोठे गॅलन भरून बिअर लोकांच्या घरी पोहोचवली जाऊ लागली. तेव्हाचे बहुतांश ग्राहक भारतात राहणारे इंग्रज होते. हा समूह मद्रास, बंगळुरू व निलगिरी येथे राहणाऱ्या ब्रिटिश सैनिकांना बिअर पुरवत असे. पाहता - पाहता या बिअरची चव लोकांच्या जिभेवर रंगू लागली.

1947 मध्ये भारतीयाने विकत घेतली कंपनी

विजय मल्ल्या यांचे वडील विठ्ठल मल्ल्या यांनी 1946 मध्ये युनायटेड ब्युरीज ग्रुपचे काही शेअर्स खरेदी केले. त्यावेळी ते देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक होते. पुढच्या वर्षी 1947 मध्ये त्यांनी संपूर्ण कंपनी विकत घेतली. 1948 मध्ये ते कंपनीचे पहिले भारतीय अध्यक्ष बनले. 1950 मध्ये त्याचे मुख्यालय बंगळुरू येथे स्थापन करण्यात आले. विठ्ठल मल्ल्या यांनी हळूहळू लहान डिस्टिलरीज व त्यांची गोदामे देशभरात विकत घेण्यास सुरुवात केली. 1959 ते 1973 पर्यंत केरळ, आंध्र प्रदेश, हैदराबाद, गोवा व बिहार या राज्यांमध्ये डिस्टिलरीज बांधल्या गेल्या.

किंगफिशर बिअर 1978 मध्ये लाँच

1970 च्या दशकात विठ्ठल मल्ल्या यांनी या व्यवसायाचा विस्तार इतर उद्योगांमध्ये केला. पॉलिमर, बॅटरी, फूड व बेव्हरेजेसमध्ये व्यवसायाचा विस्तार केला. या वर्षी कंपनीची एकूण संपत्ती 300 कोटी रुपये होती. पण विठ्ठल मल्ल्या यांचा 1983 मध्ये मृत्यू झाला.

तेव्हा त्यांचा मुलगा विजय मल्ल्या 28 वर्षांचा होता. आता वडिलांचा संपूर्ण व्यवसाय वारसा विजय मल्ल्याकडे आला होता. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मुलगा इतर व्यवसायातही हात आजमावू लागला. यात रसायन, अभियांत्रिकी, वर्तमानपत्र व बॉलीवूड मासिकाचा समावेश होता. मात्र मल्ल्याला या व्यवसायांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. पण अल्कोहल अर्थात बिअरचा धंदा सुरूच होता. विजय मल्ल्या यांनी किंगफिशर प्रीमियम नावाने 1978 मध्ये युनायटेड ब्रुअरीजच्या छत्राखाली बिअरची विक्री सुरू केली.

बिअरच्या मार्केटिंगसाठी किंगफिशर कॅलेंडर लाँच

आयपीएल संघापासून फॉर्म्युला वन संघ विकत घेणे असो किंवा एअरलाइन सुरू करणे... या सर्वांकडे किंगफिशरचे विस्तारित विपणन धोरण म्हणून पाहिले जात होते. आयपीएलमधील किंगफिशरची जाहिरात लोकांच्या ओठावर गेली होती. उ ला ला ला ले ओ…. वंडरमन थॉम्पसन या क्रिएटिव्ह एजन्सीच्या जे वॉल्टर थॉम्पसन यांनी ही ट्यून तयार केली होती. त्यात धोनीपासून विराट कोहली व ख्रिस गेलसारखे क्रिकेटर डान्स करताना दिसतात. किंगफिशर कॅलेंडर सुरू करणे, आयपीएल संघ व फॉर्म्युला वन संघ खरेदी करणे हे देखील या मार्केटिंग धोरणाचा भाग होते. या सर्वांत फन व गुड टाइम हा प्रमोशनचा आधार होता.

वाढदिवसानिमित्त मुलाला किंगफिशर एअरलाइन्सची भेट

किंगफिशर एअरलाइन्सच्या स्थापनेची घोषणा 2003 मध्ये झाली. पण या विमान कंपनीचे कामकाज 2005 पासून सुरू झाले. त्याची मूळ कंपनी देखील युनायटेड ब्रुअरीज होती. लो कॉस्ट कॅरियरमध्ये त्याचा वाटा सुमारे 50% होता. ही विमान कंपनी सुरू होण्यामागे एक विशेष गोष्ट होती. 9 मे 2005 रोजी पहिले विमान दिल्लीहून मुंबईला निघाले. त्याच्या एक दिवस अगोदर विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याचा 18 वा वाढदिवस होता. विजय मल्ल्याने आपल्या मुलाला वाढदिवसाची भेट म्हणून ही कंपनी दिल्याचे सांगितले जाते. पण नंतर ही भेट विजय मल्ल्यासाठी अडचणीची ठरली.

किंगफिशर एअरलाइन्स सुरू करण्यामागचा एक हेतू किंगफिशर बिअरच्या जाहिराती व विक्री वाढवणे हा होता, असेही सांगितले जाते. खरे तर 1985 मध्ये, अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने अल्कोहलच्या जाहिरातीवर बंदी घातली होती. त्यामुळे किंगफिशरने सर्वप्रथम मिनरल वॉटर बनवून प्रमोशन केले. 2005 मध्ये, किंगफिशर विमानाच्या केबिनमध्ये अल्कोहलची जाहिरात झाली. ही एअरलाइन फाइव्ह स्टार एअर ट्रॅव्हलचे दुसरे नाव बनली.

2007 मध्ये किंगफिशरमध्ये एअर डेक्कन एअरलाइन विलीन झाली. यामुळे 71 विमानांच्या ताफ्यासह, 30% प्रवासी देखील त्यांच्या वाट्याला आले. या वर्षी कंपनीला 1540 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. ही या विमान कंपनीच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी होती. 2008 मध्ये विजय मल्ल्याने आयपीएल संघही विकत घेतला. रॉयल चॅलेंजर बंगळुरू 2016 पर्यंत विजय मल्ल्याकडेच होते.

किंगफिशर कॅलेंडरद्वारे दीपिका पदुकोणसारखे मॉडेल लॉन्च

2003 साली विजय मल्ल्या यांनी किंगफिशर नामक कॅलेंडर काढण्यास सुरुवात केली. त्यात स्विमसूट घातलेल्या त्या वर्षीच्या सुपरमॉडेल्सची फोटो छापण्यात येत होती. 2010 पासून MTV वर सुपरमॉडेल्स निवडण्यासाठी एक शो देखील सुरू करण्यात आला. 2021 पर्यंत हे कॅलेंडर दरवर्षी छापले जात होते. हे कॅलेंडर विजय मल्ल्याची 'द मॅन ऑफ गुड टाइम्स' इमेज बनवण्यात उपयोगी ठरले.

वर्ष 2020…बिअरची विक्री सुरू, पण एअरलाइन जमिनीवर

2011 पासून किंगफिशर एअरलाइन तोट्यात जाऊ लागली. 2007 मधील एअर डेक्कनचे अधिग्रहण हे त्यामागील एक कारण होते. या अधिग्रहणानंतर एअरलाइनला सलग 3 वर्षांत सुमारे 1000 कोटी रुपयांचा तोटा झाला. 2012 पर्यंत परिस्थिती एवढी बिकट झाली होती की, काही उड्डाणे बंद करावी लागली. कर्मचाऱ्यांना पगार मिळणेही बंद झाले. विरोधात निदर्शने सुरू झाली.

2009 मध्ये 22.9% पेक्षा जास्त शेअरसह एअरलाइन भारतीय बाजारपेठेत आघाडीवर होती. पण 2012 मध्ये याच विमान कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. उत्पन्न कमी होऊन तोटा वाढू लागला. कर्जाचा बोजाही वाढू लागला. पण विजय मल्ल्यांना या संकटावर मात करण्यासाठी बाजारातून निधी उभा करता आला नाही. याऊलट त्याचा स्वतःच्या ऐषोआरामावर होणारा खर्च पूर्वीसारखाच अव्याहत राहिला.

2012 च्या अखेरीस, अर्ध्याहून अधिक विमाने जमिनीवर उतरली. 20 ऑक्टोबर रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी परवाना रद्द केला. उड्डाणांच्या संचालनासंबंधीच्या नियामकाच्या अटींची पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. फेब्रुवारी 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे हक्कही निलंबित करण्यात आले. यामुळे जुलै 2014 पर्यंत या कंपनीची सुमारे 9,000 कोटी रुपयांची कर्जे अनुत्पादित मालमत्ता बनली होती. कंपनीने स्वतःला बँक करप्ट घोषित केले.

2016 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियासह 13 बँकांनी कर्ज वसुली न्यायाधिकरणात 9000 कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीसाठी अर्ज दाखल केले. याच वर्षी विमान कंपनीचा प्रवर्तक विजय मल्ल्या देश सोडून इंग्लंडला पळून गेला.

तेव्हापासून भारतीय न्यायालयापासून ब्रिटनच्या न्यायालयापर्यंत त्यांच्या प्रत्यार्पणासाठी खटले सुरू आहेत. 2021 मध्ये, डेट रिकव्हरी ट्रिब्युनलने विजय मल्ल्याचे युनायटेड ब्रुअरीजमधील 39.64 दशलक्ष शेअर्स हेनेकेन एनव्हीला 5,824 कोटी रुपयांना विकले. अशाप्रकारे भारतात किंगफिशर बिअर बनवणारा यूबी ग्रुप युरोपियन कंपनी हेनेकेनच्या अखत्यारीत गेला.