आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vikas Dube Case Updates | Vikas Dubey Hid In Kanpur For Two Days, Before The Police Arrived

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारवाई:विकास दुबे दोन दिवस कानपूरमध्ये लपला, पोलिस येण्यापूर्वीच पळाला

फरिदाबाद/कानपूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खुनी गँगस्टरचा खबऱ्या एसएचओसह दोन पोलिस अटकेत
  • फरिदाबादमध्ये दुबेला आश्रय देणारा नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह निघाला

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ८ पोलिसांच्या हत्येचा आरोप असलेला विकास दुबे हरियाणाच्या फरिदाबादमध्ये पोलिसांच्या हातून निसटला. येथे तो भावजयीच्या व मावशीच्या घरी लपला होता. पोलिसांनी येथे विकासचा एक साथीदार कार्तिकेय ऊर्फ प्रभातसिंह याला ४ पिस्तुलांसह अटक केली आहे. दुबेला आश्रय दिल्याच्या कारणावरून पोलिसांनी घरमालक श्रवण आणि त्याचा मुलगा अंकुर यास अटक केली. दरम्यान, वैद्यकीय चाचणीत श्रवण कोरोना पॉझिटिव्ह निघाला. प्रभातने पोलिसांना सांगितले की, ३ जुलैला पोलिसांच्या हत्येनंतर दोन दिवस विकास कानपूरमध्ये शिवलीतच लपलेला होता, तर उत्तर प्रदेश पोलिसांच्या ४० पथकांसह उत्तराखंड, दिल्ली, एमपीसह १० राज्यांतील पोलिस त्याचा शोध घेत होते. तो नेपाळला गेल्याचीही चर्चा होती. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांतकुमार म्हणाले, गुन्हेगारांवर अशी कारवाई केली जाईल की ती आदर्श ठरेल. दुबेला शोधून काढू. दरम्यान, दुबेवरील बक्षीस रक्कम ५ लाख करण्यात आली.

विकासचा साथीदार अमर दुबे चकमकीत ठार

फरिदाबादमध्ये अटक केलेल्या प्रभातच्या माहितीवरून मंगळवारी रात्री यूपीच्या हमीरपूरमध्ये पोलिसांनी चकमकीत विकासचा नातेवाईक अमर दुबे याला ठार केले. अमर रंगकाम आणि दारूच्या ठेक्यांची वसुली करत असे. तोही पोलिसांच्या हत्येत आरोपी होता. अमरचा ९ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. आतापर्यंत या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

चॅनलच्या कार्यालयात शरण आल्याच्या बातम्या...

सायंकाळी उशिरा विकास दुबे नोएडात असल्याच्या बातम्या आल्या. शिवाय तो एका न्यूज चॅनलमध्ये पोलिसांना शरण येणार असल्याचे कळाले. यानंतर पोलिसांनी या भागात फिल्म सिटीमध्ये प्रचंड बंदोबस्त लावला आहे.

तिवारी आणि शर्मा या खबऱ्यांची चौकशी

पोलिसांनी चौबेपूरचा निलंबित एसएचओ विनय तिवारी आणि बीट इन्चार्ज के. के. शर्मा यांना अटक केली असून त्यांच्यावर गुंड दुबे याचे खबरे असल्याचा आरोप आहे. या दोघांना बिकरू गावात नेण्यात आले. तेथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा सीन कसा होता ते समजावण्यास सांगितले. मात्र दोघे काहीही सागू शकले नाहीत. तिवारी हा दुबेच्या हल्ल्यातून बचावला होता.

बातम्या आणखी आहेत...